Mumbai-Shirdi Vande Bharat Express : मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठ अपडेट ! आता ‘या’ ठिकाणी पण मिळणार थांबा?

Published on -

Mumbai-Shirdi Vande Bharat Express : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. राजधानी मुंबई ते शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस विशेष महत्त्वाची राहणार आहे. खरं पाहता, मुंबईहून साईनगर शिर्डी या ठिकाणी रोजाना हजारो भाविक येजा करतात यामुळे ही वंदे भारत एक्सप्रेस या भाविकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.

दरम्यान आता या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसच्या रूट मॅप बद्दल जर बोलायचं झालं तर ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई, शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नाशिक, ठाणे या मार्गे धावणार असल्याचे रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या वंदे भारत एक्सप्रेसला मनमाड, नासिक आणि ठाणे या ठिकाणी अधिकृत थांबे राहणार आहेत. मात्र आता या वंदे भारत एक्सप्रेसला कोपरगाव मध्ये देखील थांबा मिळाला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. खरं पाहता कोपरगाव येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी मुंबईला जात असतात. कामानिमित्त हजारो प्रवासी कोपरगाव ते मुंबई प्रवास करतात.

मात्र कोपरगावहुन मुंबईला जाण्यासाठी आठवड्यातून केवळ एकच एक्सप्रेस रेल्वे आहे. विशेष म्हणजे ही रेल्वे रात्रीच्या वेळी असल्याने कोपरगाव ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागला आहे. विशेषता रेल्वे मार्गाने प्रवास करण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.

अशातच आता सीएसएमटी ते शिर्डी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याने कोपरगाव या ठिकाणी अधिकृत थांबा या वंदे भारत एक्सप्रेस ला दिला जावा अशी मागणी होऊ लागली आहे. सध्या स्थितीला कोपरगाव हुन मुंबईला जाण्यासाठी रेल्वे मार्गाने प्रवास करणारे प्रवासी मनमाड या ठिकाणी जातात आणि मग तेथून मुंबई गाठतात.

अशा परिस्थितीत कोपरगाव ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावहुन थेट मुंबईसाठी एखादी एक्सप्रेस सुरू व्हावी अशी मागणी आहे. आता मात्र ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याने या एक्सप्रेसलाच कोपरगाव या ठिकाणी अधिकृत थांबा मिळावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी लावून धरले आहे. विशेष म्हणजे आमदार काळे यांनी यासाठी पाठपुरावा देखील सुरू केला आहे.

आमदार काळे यांनी मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कोपरगाव या ठिकाणी थांबा मिळावा यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला असून यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले आहे. निश्चितच काळे यांनी केलेला हा पाठपुरावा यशस्वी होतो का आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

मित्रांनो मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे टाईम टेबल आणि तिकिटाचे दर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

बातमी कामाची ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस विषयी ए टू झेड माहिती एका क्लिकवर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe