Mumbai To Delhi Expressway News : भारतात सध्या अनेक मोठमोठ्या महामार्गांची कामे सुरू आहेत. खरे तर अमेरिका, जपान, चायना यांसारख्या विकसित देशांमध्ये रस्त्यांचे नेटवर्क फार स्ट्रॉंग आहे. असे म्हणतात की कोणत्याही विकसित देशात तेथील रस्त्यांचे नेटवर्क महत्त्वाची भूमिका निभावत असते. यामुळे आता भारतातही रस्त्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग केले जात आहे.
देशातील रस्त्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग व्हावे यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली या दरम्यान एक नवीन एक्सप्रेस वे तयार होत असून या एक्सप्रेस वे ची लांबी 1386 किलोमीटर इतकी राहणार आहे. या एक्सप्रेस वे मुळे मुंबई ते दिल्ली या दरम्यानचा प्रवास वेगवान होणार असून आता याच महामार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबई – दिल्ली महामार्गाचे 82 टक्के काम पूर्ण
मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे चे 80 टक्के होणारे काम पूर्ण झाले आहे. हा 1386 किलोमीटर लांबीचा महामार्ग देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग असून याचे 82 टक्के काम पूर्ण झाले असून आत्तापर्यंत या महामार्गाचा काही भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
या रस्त्याचा एकूण 1156 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून यापैकी 756 किलोमीटर लांबीच्या मार्गावर वाहतूक सुद्धा सुरू झाली आहे. जून 2024 पर्यंत या महामार्गाचे 82 टक्के काम पूर्ण झाले होते मात्र त्यानंतर या मार्गाचे काही भागातील काम कासव गतीने पूर्ण होत आहे.
या राज्यांमधून जाणार नवा महामार्ग
सुरत ते महाराष्ट्र गुजरात बॉर्डर वरील 140 किलोमीटर लांबीच्या पाच टप्प्यांमध्ये काम सध्या अगदीच स्लो गतीने सुरु आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे सध्याचा मुंबई दिल्ली प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे.
सध्या मुंबई ते दिल्ली दरम्यान प्रवास करण्यासाठी 24 तास लागतात मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा कालावधी 12 तासांवर येणार आहे. हा महामार्ग देशातील हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार आहे.
भविष्यात 12 पदरी होणार प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस वे
हा एक आठ पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग असून भविष्यात या महामार्गाची रुंदी वाढवली जाणार आहे आणि हा मार्ग बारा पदरी बनवला जाईल. या मार्गावरून वाहन 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असतील.
या महामार्ग प्रकल्पासाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून प्रत्यक्षात जेव्हा रस्त्याचे काम पूर्ण होईल तेव्हाच या महामार्ग प्रकल्पाच्या किमतीचा अंदाज बांधता येणे शक्य होणार आहे. नक्कीच हा महामार्ग प्रकल्प देशाच्या एकात्मिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे.
एकात्मिक विकासाला मिळणार गती
खरेतर, या रस्त्याच्या प्रकल्पामुळे देशातील कृषी उद्योग शिक्षण आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. या महामार्गामुळे राज्या-राज्यांमधील अंतर कमी होणार आहे. समृद्धी महामार्ग हा सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग प्रकल्प आहे. मात्र जेव्हा मुंबई ते दिल्ली हा संपूर्ण महामार्ग सुरू होईल तेव्हा हा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग प्रकल्प ठरणार आहे.
यामुळे या महामार्ग प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले पाहिजे अशी इच्छा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र सध्या या महामार्गाच्या कामामध्ये काही ठिकाणी अडचण निर्माण होत आहे आणि हीच अडचण सोडवून या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्न करत असताना दिसत आहे.