मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा ‘हा’ महत्त्वाचा टप्पा पूर्ण, ‘या’ महिन्यात सुरू होणार एमटीएचएल प्रकल्प

Ajay Patil
Published:
Mumbai Trans Harbour Link Update

Mumbai Trans Harbour Link Update : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प मुंबईच्या वैभवात भर घालण्यासाठी मोलाची भूमिका निभाऊ शकतो. शहरातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असून याचाच एक भाग म्हणून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या सागरी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जात आहे.

हा प्रकल्प शिवडी व न्हावा यांना जोडणारा 22 किलोमीटर लांबीचा सागरी पूल आहे. या 22 किलोमीटर पैकी जवळपास साडेसोळा किलोमीटरचे अंतर समुद्रात असून साडेपाच किलोमीटर अंतर हे जमिनीवर आहे. हा सहा पदरी म्हणजे एका बाजूने तीन अन दुसऱ्या बाजूने तीन अशा सहा मार्गिका असलेला पूल आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ; ‘या’ जिल्ह्यात मे महिन्यातही पडणार वादळी पाऊस ! पहा काय म्हणताय डख….

असा दावा केला जात आहे की या पुलाच्या निर्मितीनंतर मुंबई ते अलिबाग हे अंतर मात्र 15 ते 20 मिनिटात प्रवाशांना गाठता येणार आहे. निश्चितच मुंबईच्या दृष्टीने हा मार्ग अति महत्त्वाचा आहे. दरम्यान या एमटीएचएल म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या दुसऱ्या पॅकेजचा ३०वा ओएसडी स्पॅन आयताकृती एच बार्जच्या मदतीने उभारण्यात आला आहे. स्पॅन्सची जोडणी ही २६ किमी अंतरावर कारंजा येथे झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे हे एक महत्त्वाचे काम होते. आता हे काम पूर्ण झाले असल्याने या प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, शेत जमिनीची खरेदी विक्री करताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्या, नाहीतर…..

सध्या स्थितीला या प्रकल्पाचे 90% काम जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित दहा टक्के काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून या प्रकल्पाचा एक महत्त्वाच काम नुकतच पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळाली आहे. आता हा प्रकल्प वेळेतच पूर्ण होणार असा आशावाद देखील व्यक्त होत आहे.

या प्रकल्पाचे यावर्षीच संपूर्ण काम केले जाईल आणि हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाईल असे सांगितले जात आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर 2023 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएने आखले आहे. निश्चितच जर सर्व कामे वेळेत झाली तर हा प्रकल्प येत्या महिन्यात पूर्ण होईल आणि.

हे पण वाचा :- धक्कादायक ! आता ‘या’ कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले, कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe