Mumbai Vande Bharat Express News : मुंबईकरांना आत्तापर्यंत तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या तीन महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस भारतीय रेल्वे कडून सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान आता मुंबईकरांना वंदे भारत एक्सप्रेसपेक्षाही खास भेट भारतीय रेल्वेच्या माध्यमातून मिळणार आहे. खरं पाहता वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे मेट्रो सुरु करण्याचा प्लॅन भारतीय रेल्वेने आखला आहे. ही वंदे मेट्रो ट्रेन डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- नादखुळा ! उच्चशिक्षित तरुणाने सुरु केली अंजीर शेती; 30 गुंठ्यात मिळवले 10 लाखाचे उत्पन्न, असं केलं नियोजन
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार ही वंदे मेट्रो 100 किलोमीटर अंतरावर वचलेल्या दोन शहरांना कनेक्ट करण्याचे काम करणार आहे. अर्थातच ही गाडी कमी अंतरावर वसलेल्या दोन शहरांदरम्यान प्रवास करण्यासाठी सुरू केली जाणार आहे.
याचा सर्वाधिक फायदा रोजाना कामानिमित्त एका शहराहून दुसऱ्या शहरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.तसेच विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे.
मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे ही गाडी प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर 2024-25 मध्ये या गाडीचे प्रोडक्शन वाढवले जाणार आहे. ही गाडी मुंबईसारख्या महानगरात सुरू करण्याचा मानस शासनाचा राहणार आहे.
हे पण वाचा :- पंजाब डख यांचा आजचा हवामान अंदाज : येत्या काही तासात ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर
म्हणजेच ही गाडी मुंबई व आजूबाजूला शंभर किलोमीटर अंतरावर वसलेल्या शहरांना कनेक्ट करण्यासाठी सुरू केली जाऊ शकते असा आशावाद व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी एका रूटवर एका दिवसात चार ते पाच वेळा धावणार आहे.
अर्थातच शहरात ज्या पद्धतीने मेट्रो सुरू झाली आहे त्याच पद्धतीने दोन शहरांना कनेक्ट करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या धरतीवर ही वंदे मेट्रो सुरु होणार असल्याचे प्राथमिक चित्र तयार होत आहे. निश्चितच या ट्रेनचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार असून आता मुंबईकरांना वंदे मेट्रोची विशेष आतुरता लागून राहणार आहे.