मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या सीट्स वाढल्यात, रेल्वेने 4 एसी चेअरकार कोच बसवलेत

मुंबईकरांसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. राजधानी मुंबईहून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचसची संख्या वाढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Mumbai Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुंबईहून सध्या सहा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.

दरम्यान यातील एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला चार नवीन एसी चेअर कार कोच बसवण्यात आले आहेत. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला राजधानी मुंबईवरून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव या सहा मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.

दरम्यान या सहापैकी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात रेल्वे कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई सेंट्रल – गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेसला आता अतिरिक्त कोच 

मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला मिळणाऱ्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर या गाडीच्या कोचेस मध्ये वाढ करण्याचा एक मोठा निर्णय नुकताच घेतलेला आहे.

पश्‍चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या सुपरहिट ठरलेल्या वंदे भारत ट्रेनला 4 कायमस्वरूपी एसी चेअर कार कोच बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

महत्त्वाची बाब अशी की, पश्चिम रेल्वेच्या या निर्णयाची अंमलबजावणी कालपासून म्हणजेच 11 मे 2025 पासून सुरू झाली असून यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना दिलासा मिळणार असे. यामुळे आता या गाडीमध्ये रेल्वे प्रवाशांना आता अधिक जागा उपलब्ध होणार आहे.

किती सीट्स वाढणार? 

या नव्या कोचमुळे ट्रेनची एकूण आसन क्षमता मोठी वाढणार आहे. नव्याने जोडल्या जाणाऱ्या एसी कोचमुळे या गाडीचे अचनक्षमता 1128 वरून थेट 1440 एवढी झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयानंतर आता ट्रेनमध्ये 2 एक्झिक्युटिव्ह चेअर कोच आणि 18 एसी चेअर कार कोच असतात.

या गाडीमध्ये आता 312 सीट्स वाढल्या आहेत. त्यामुळे आता एका आठवड्यात 5616 आणि महिन्याला 22,464 अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक होऊ शकणार आहे. म्हणजेच या निर्णयाचा हजारो नागरिकांना फायदा होईल असे आपण म्हणू शकतो.

महाराष्ट्राला आणखी एका नव्या वंदे भारतची भेट मिळणार

दुसरीकडे मुंबईला आणि पुण्याला लवकरच आणखी नव्या वंदे भारतची भेट मिळणार असल्याची बातमी सुद्धा समोर येत आहे. पुणे ते नागपूर दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल अशी बातमी नुकतीच समोर आली असून ही गाडी येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात रुळावर धावताना दिसणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की मुंबई ते नागपूर या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News