मुंबईकरांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा असेल मार्ग? वाचा….

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला एक नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. खरे तर मुंबई ते गोवा दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन पुढे मंगळूरू पर्यंत चालवण्याचा प्लॅन रेल्वे कडून आखला जात आहे.

Published on -

Mumbai Vande Bharat Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वाधिक चर्चेत असणारी ट्रेन. खरतर ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर प्रवाशांचा प्रवासा फारच वेगवान झाला. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली.

यानंतर देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. महाराष्ट्रात देखील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.

अशातच आता महाराष्ट्राला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहेत. मुंबईकरांसाठी एक नवीन वंदे भारत ट्रेन धावणार आहे. ही गाडी मुंबई ते मंगळुरू यादरम्यान चालवली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा आणि गोवा-मंगळुरू हे दोन्ही मार्ग एकत्र केले जाणार आणि दोन ऐवजी एकच रेल्वे गाडी मुंबई ते मंगळूरु अशी धावणार आहे.

दरम्यान आता आपण रेल्वेचा हा प्लॅन यशस्वी झाल्यानंतर मुंबई ते मंगळूरू दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रक कसे राहणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या मुंबई-गोवा वंदे भारत सकाळी 5.25 वाजता रवाना होते आणि दुपारी 1.10 वाजता गोवा पोहोचते. मात्र नवीन प्लाननुसार, मंगळुरूपर्यंत थेट जाणार आहे. मंगळुरूला 6 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचणार आहे.

याचप्रमाणे मंगळुरू-गोवा वंदे भारत सकाळी 8.30 वाजता रवाना होईल आणि दुपारी 1.10 वाजता गोव्याला पोहोचेल. तर, रात्री 9 वाजता मुंबईत पोहोचेल. यामुळे मुंबई ते मंगळूरु दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे.

सध्या महाराष्ट्रात किती वंदे भारत ट्रेन सुरू आहेत

महाराष्ट्रातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद नागपूर ते बिलास्पुर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर सध्या वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

दरम्यान मुंबई येथील सीएसएमटी ते मडगाव दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत ट्रेन पुढे मंगळूरु पर्यंत चालवण्याचा प्लॅन आता रेल्वे कडून आखला जात असल्याची माहिती हाती आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe