Mumbai Versova Virar Sea Link Project : मुंबई शहरात आणि उपनगरात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून यामुळे वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे परिणामी शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
तसेच शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये कोस्टल रोड, सागरी सेतू, उड्डाणपूल, भुयारी मार्ग यांसारख्या कामांचा समावेश आहे. वर्सोवा विरार सी लिंक प्रोजेक्ट हा देखील याच उपाय योजनेचा एक भाग आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ महत्त्वाचा पूल पुढल्या महिन्यात सुरु होणार, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा, पहा…
वर्सोवा ते विरार हे अंतर कमी करण्यासाठी तसेच प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वास्तविक हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला होता. परंतु काही आर्थिक आणि तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे अर्थातच एम एम आर डी ए कडे सुपूर्द करण्यात आला आहे.
दरम्यान आता या प्राधिकरणाने हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतल्यानंतर या प्रकल्पाचा विस्तार पालघर पर्यंत करण्याचे ठरवण्यात आले आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! आगामी पाच ते सहा दिवस ‘या’ विभागात पडणार अवकाळी पाऊस, गारपीटही होणार, पहा….
हा प्रकल्प पालघर पर्यंत वाढवण्याचा प्रस्तावाला मान्यता देखील मिळाली आहे. दरम्यान आता एमएमआरडीएने भू-तांत्रिक अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा जारी केल्या आहेत.
आता हा भू तांत्रिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार होणार आहे आणि त्यानंतरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. म्हणजे जवळपास एक ते दीड वर्षानंतर या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आता ‘इतकं’ मिळणार अनुदान; पहा पात्रता अन अर्ज करण्याची प्रोसेस