मुंबईला मिळणार आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट! शहरातील ‘हा’ भाग सुद्धा मेट्रोने जोडला जाणार, कसा असणार नवीन मेट्रो मार्ग ? वाचा…

मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. दरम्यान, आता उल्हासनगरमध्येही मेट्रो धावणार आहे. उल्हासनगरमध्ये मेट्रो सुरू होणार असल्याने भविष्यात उल्हासनगरहुन थेट मुंबईपर्यंत मेट्रोने जाता येणे शक्य होईल.

Published on -

Mumbai Metro News : राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात असून मेट्रो मार्गांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुपरफास्ट होत आहे. दरम्यान आता मुंबईला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार असून त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सोयीचा होईल अशी आशा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर मधील नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो सुरू केली जाणार आहे. उल्हासनगरला लवकरच मेट्रोची भेट मिळणार असून यामुळे येथील जनतेला जलद गतीने मुंबईत पोहोचता येणार आहे. सध्या उल्हासनगर होऊन मुंबईला यायचे असेल तर लोकल शिवाय दुसरा कोणताच सक्षम पर्याय दिसत नाही.

नक्कीच रस्ते मार्गाचा पर्याय उपलब्ध आहे मात्र रस्ते मार्गाने प्रवास करायचे म्हटले म्हणजेच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो दुसरीकडे पैसे अधिक खर्च करावे लागतात आणि वेळही जातो. हेच कारण आहे की उल्हासनगरहुन मुंबईला यायचे असल्यास लोकलचा प्रवासच सर्वात बेस्ट असल्याचे बोलले जाते.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गिकेचा विस्तार

मात्र लोकलचा प्रवास हा फारच आव्हानात्मक असतो कारण या मार्गांवरील लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. पण आता उल्हासनगर ते मुंबई असा प्रवास वेगवान होणार आहे.

कारण की आता उल्हासनगर मध्ये मेट्रो धावणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गिकेचा विस्तार आता कल्याणऐवजी उल्हासनगरपर्यंत केला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा विस्तारित मेट्रो मार्ग विकसित केला जाणार असून खडकपाडा ते उल्हासनगर असा मेट्रोचा विस्तार होणार आहे.

2024-25 वर्षासाठीच्या अर्थसंकल्पानुसार मेट्रो 5चा कल्याण-खडकपाडा आणि खडकपाडा-उल्हासनगर अशा 7.7 किमीच्या विस्तारीत मार्गिकेच्या कामासा सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात यासंबंधीची तरतूद करुन या विस्तीरीकरणाच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात येणार आहे.

कसा असणार मेट्रोचा विस्तारित टप्पा ?

खरेतर, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका 24.9 किमी लांबीची आणि साडेआठ हजार कोटी खर्चाची मार्गिका आहे. या मार्गिकेवर एकूण 17 मेट्रो स्थानके आहेत. मात्र आता या मेट्रो मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार हा मार्ग ठाण्याला सुरू होऊन कल्याणपर्यंत जाणार होता.

मात्र आता मेट्रोचा विस्तार होऊन थेट खडकपाडा ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून समोर आले आहे.

पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात

आता लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ठाणे-भिवंडी टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

यानंतर भिवंडी ते कल्याण या टप्प्याचे काम सुरू होईल. मेट्रो प्रकल्प मार्ग 5 ठाणे – भिवंडी कल्याणसाठी 1,579.99 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान आता हा मार्ग कल्याणच्या पुढे उल्हासनगर पर्यंत जाणार असल्याने त्या भागातील नागरिकांना या मेट्रो मार्गाचा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe