Mumbai Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. देशातील सर्वच भागांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने रेल्वे कडून प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात देखील अनेक मोठमोठे रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. मात्र आता देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई मधून असा एक रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे ज्यामुळे रेल्वे कनेक्टिव्हिटी चा एक नवीन अध्याय लिहिला जाणार आहे.
दुबई ते मुंबई असा थेट नवा रेल्वे मार्ग तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. ही योजना संयुक्त अरब अमिरातीने आखली असून ही योजना प्रत्यक्षात साकारली गेली तर हा रेल्वे मार्ग तब्बल दोन हजार किलोमीटर लांबीचा राहणार आहे. दुबई हे जगभरातील पर्यटकांचे एक हॉट डेस्टिनेशन. भारतातूनही असंख्य पर्यटक दुबईला भेटी देतात. कामानिमित्त ही भारतातून दुबईला जाणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. हेच कारण आहे की दुबई ते मुंबई दरम्यान रेल्वे मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला जात असून पर्यटकांसाठी आणि उद्योजकांसाठी दुबई मुंबई रेल्वे मार्ग फारच सोयीचा ठरणार आहे.

आता, याच प्रकल्पाबाबत एक नव अपडेट हाती आल आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय सल्लागार संस्थेने या संकल्पनेवर प्राथमिक अभ्यास सुरू केला असून, हा जगातील सर्वांत मोठा आणि पहिला पूर्णपणे समुद्राखालून जाणारा रेल्वे मार्ग असू शकतो, अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.दोन देशांमधील प्रवास आणि व्यापाराला वेग देण्यासाठी हा रेल्वे प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो. विशेषतः या प्रकल्पामुळे भारताकडून पाणी आणि अमिरातीकडून तेल यांची देवाणघेवाण अधिक सुकर होईल. अंदाजे दोन हजार किलोमीटर लांबीचा हा मार्ग असू शकतो आणि अत्यंत वेगवान तंत्रज्ञानाच्या मदतीने या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांना विमानाइतका वेग अनुभवता येईल असे बोलले जात आहे.
तथापि, हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी तांत्रिक क्षमता, पर्यावरणीय परिणाम आणि आर्थिक व्यवहार्यता या घटकांचा सखोल अभ्यास केला जात आहे. समुद्राखालून रेल्वे मार्ग उभारणे ही अभियांत्रिकी क्षेत्रातील मोठी क्रांती असेल. जर सर्व अडथळे पार केले, तर भविष्यात दुबई ते मुंबई हा प्रवास एका नव्या पद्धतीने अनुभवता येईल.हा प्रकल्प सत्यात उतरला तर दोन हजार किलोमीटर समुद्रा खालून जाणारा हा जगातील पहिलाच रेल्वेमार्ग प्रकल्प राहणार आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या फूजैराह शहरातून सुरु होणारी ही रेल्वे रॉकेटच्या स्पीडने मुंबईत पोहोचणार असं बोलल जात आहे.
खरे तर या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट हे तेल आणि पाण्याचे देवानघेवाण करणे हेच असणार असे संयुक्त अरब अमिरातीमधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र सध्या हा प्रकल्प फक्त कागदावरच आहे. या प्रकल्पाच्या सर्व व्यावहारिक गोष्टी तपासल्यानंतरच याबाबत पुढील कार्यवाई सुरू होणार आहे. यामुळे खरंच दुबई ते मुंबई दरम्यान दोन हजार किलोमीटर लांबीचा संपूर्ण समुद्रा खालून जाणारा रेल्वे मार्ग प्रकल्प विकसित होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.