Mutual Fund Lumpsum Investment | म्युच्युअल फंड मध्ये एकरकमी 5 लाखाची गुंतवणूक केली तर 15 वर्षांनी किती रिटर्न मिळणार ?

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण आज आपण Lumpsum गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना ऍव्हरेज किती टक्के दराने परतावा मिळतो आणि पाच लाखांची एक रकमी गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांनी गुंतवणूकदारांना अंदाजे किती रिटर्न मिळणार याबाबतचा आढावा घेणार आहोत.

Published on -

Mutual Fund Lumpsum Investment : म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. खरे तर म्युच्युअल फंड ही शेअर बाजारावर आधारित गुंतवणुकीची एक जोखीमपूर्ण आणि उच्च परतावा देणारी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेतून ग्राहकांना चांगला परतावा मिळत असल्याने आता अनेकजण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहेत.

काही लोक एकरकमी म्हणजे Lumpsum गुंतवणूक करतात तर काही लोक एसआयपी द्वारे दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवत असतात. दरम्यान आज आपण म्युच्युअल फंड मध्ये एकरकमी पाच लाखाची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांनी किती रिटर्न मिळू शकतात याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Mutual Fund ठरतोय फायदेशीर

सध्या भारतीय शेअर बाजारात मोठी मंदी दिसून येत आहे. सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजार दबावात असून त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र शेअर बाजारातील ही घसरण गुंतवणूकदारांसाठी एक नवीन संधी सुद्धा ओपन करत आहे.

सध्या शेअर बाजारात मोठी घसरण आहे आणि या घसरणीच्या काळात बाजारात पैसा लावला तर आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मार्केटमधील अभ्यासकांनी सध्याचा काळ हा Mutual Fund मध्ये गुंतवणुकीसाठी देखील फायद्याचा राहणार आहे.

सध्याच्या घसरणीच्या काळात जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म मध्ये चांगले रिटर्न मिळणार आहेत कारण की कमी किमतीत जास्त युनिट अलॉट होणार आहेत.

5 लाखाची गुंतवणूक केल्यास 15 वर्षांनी किती रिटर्न मिळणार?

म्युच्युअल फंड मध्ये एकरकमी पाच लाखांची गुंतवणूक केल्यास अन वार्षिक 12 टक्के दराने जर रिटर्न मिळाले तर 15 वर्षांनी गुंतवणूकदारांना 27 लाख 36 हजार 783 रुपये मिळणार आहेत. अर्थात 22 लाख 36 हजार 783 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही रक्कम वाढू सुद्धा शकते कारण की लॉन्ग टर्म मध्ये म्युच्युअल फंड मधून याहीपेक्षा अधिकचे रिटर्न मिळण्याची शक्यता असते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड हा लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी विशेष फायद्याचा ठरतो कारण की लॉन्ग टर्म मध्ये बाजारातील चढ उताराचा फारसा फटका बसत नाही. हेच कारण आहे की शेअर बाजारातील तज्ञ म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असल्यास लॉंग टर्म मध्येच करावी असा सल्ला देतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe