Mutual Fund Plan : कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळावा, अशी अपेक्षा प्रत्येक गुंतवणूकदाराची असते. मात्र म्युच्यूअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमींशी निगडित असल्यामुळे योग्य माहिती आणि दीर्घकालीन दृष्टीकोन आवश्यक असतो.
अशाच एका फंडाने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. LIC MF Infrastructure Fund या फंडाने अवघ्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांचा पैसा जवळपास दुप्पट करून दाखवला आहे.

LIC MF Infrastructure Fund ची सुरुवात 2 जानेवारी 2013 रोजी झाली. हा फंड निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर TRI निर्देशांकावर आधारित असून पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.
सध्या या फंडाची एकूण मालमत्ता व्यवस्थापन (AUM) एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. स्थापनेपासून या फंडाने सरासरी 15 टक्क्यांहून अधिक परतावा दिला असून LIC म्युच्यूअल फंडच्या इतर योजनांपैकी हा एक सर्वोत्तम कामगिरी करणारा फंड मानला जातो.
एकरकमी गुंतवणुकीच्या बाबतीत हा फंड विशेष आकर्षक ठरतो. गेल्या तीन वर्षांत या फंडाने सुमारे 28 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी केलेली एक लाख रुपयांची गुंतवणूक आज सुमारे दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
पाच वर्षांत हीच रक्कम अंदाजे तीन लाख एकतीस हजार रुपये होते, तर दहा वर्षांत सुमारे पाच लाख सतरा हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. मजबूत फंड व्यवस्थापन आणि योग्य क्षेत्रनिवडीमुळे हा परतावा शक्य झाला आहे.
SIP म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही हा फंड फायदेशीर ठरला आहे. दरमहा 10 हजार रुपयांची SIP दहा वर्षे केल्यास गुंतवणूकदारांना अंदाजे 34 लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. नियमित गुंतवणुकीमुळे बाजारातील चढ-उतारांचा धोका कमी होतो आणि कंपाउंडिंगचा मोठा फायदा मिळतो.
या फंडाच्या प्रमुख होल्डिंग्जमध्ये L&T, Tata Motors, REC आणि Cummins India यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र हा फंड उच्च जोखमीच्या श्रेणीत येत असल्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
बाजारातील परिस्थितीनुसार परतावा बदलू शकतो, त्यामुळे स्वतःची आर्थिक क्षमता आणि जोखीम सहनशीलता तपासूनच गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.













