Mutual Fund SIP : कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त रिटर्न मिळवायचा असेल तर म्युच्युअल फंड एसआयपीचा पर्याय तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. खरेतर गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकजण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करताना दिसत आहेत.
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदारांना दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते. एक म्हणजे एकरकमी म्हणजेच Lumpsum गुंतवणूक आणि दुसरी म्हणजे एसआयपी द्वारे गुंतवणूक. पण, यात एसआयपी द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गुंतवणूकदार दरमहा एक ठराविक रक्कम एस आय पी मध्ये गुंतवून एक मोठा फंड तयार करत आहेत.
दरम्यान आज आपण म्युच्युअल फंड मध्ये दररोज शंभर रुपये वाचवून गुंतवणूक केल्यास ग्राहकांना दहा वर्ष, वीस वर्षे, तीस वर्ष आणि 40 वर्ष कालावधीत किती रिटर्न मिळणार याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
100 रुपयांची एसआयपी बनवणार करोडपती
40 वर्षात किती रिटर्न मिळणार ? : प्रत्येक दिवस शंभर रुपये म्हणजे प्रतिमहा 3000 रुपयांची एसआयपी केली तर गुंतवणूकदाराला 12 टक्के दराने 40 वर्षांनी तीन कोटी 56 लाख 47 हजार 261 रुपये मिळणार आहेत. यात गुंतवणुकीची रक्कम 14 लाख 40 हजार रुपये राहणार आहे आणि उर्वरित तीन कोटी 42 लाख 7 हजार 261 रुपये गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात मिळणार आहेत.
30 वर्षात किती रिटर्न मिळणार : दरमहा 3000 रुपयांची एसआयपी केली तर गुंतवणूकदाराला 12 टक्के दराने 30 वर्षांनी एक कोटी पाच लाख 89 हजार 741 रुपये रिटर्न मिळणार आहेत. यामध्ये सदर गुंतवणूकदाराची गुंतवणूक दहा लाख 80 हजार रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित 95 लाख 9 हजार 741 रुपये त्याला व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
20 वर्षात किती रिटर्न मिळणार : एखाद्या व्यक्तीने जर दररोज शंभर रुपये वाचवून म्हणजेच प्रति महा 3000 रुपयांची एसआयपी केली तर त्याला 12 टक्के दराने वीस वर्षांनी 29 लाख 97 हजार 444 रुपये मिळणार आहेत. यामध्ये सात लाख वीस हजार रुपये हे गुंतवणूकदाराची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित 22 लाख 77 हजार 444 रूपये हे या गुंतवणुकीवरील व्याज राहणार आहे.
100 रुपयांची एसआयपी 10 वर्षांसाठी केली तर किती
रिटर्न मिळणार : जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने दररोज शंभर रुपये वाचवून एसआयपी केली म्हणजेच तीन हजार रुपये महिना एसआयपी केली तर त्याला 12 टक्के दराने 6 लाख 97 हजार 17 रुपये मिळणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक तीन लाख 60 हजार रुपये राहणार आहे आणि उर्वरित तीन लाख 37 हजार 17 रुपये व्याज म्हणून सदर गुंतवणूकदाराला रिटर्न मिळणार आहेत.