दरमहा 6 हजार रुपयाची गुंतवणूक करूनही 5 कोटींचा फंड तयार करता येतो ! SIP चं संपूर्ण गणित पहा….

तुम्ही दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून मोठा फंड तयार करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. एसआयपीमधून तुम्हाला दरमहा कमीत कमी रक्कम गुंतवून करोडो रुपयांचे रिटर्न मिळवता येणे शक्य आहे. यात दरमहा सहा हजार रुपयांची एसआयपी सुरू केली तर गुंतवणूकदारांना तब्बल पाच कोटी रुपयांचा फंड तयार करता येऊ शकतो.

Published on -

Mutual Fund SIP : तुम्हीही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीच्या तयारीत आहात का? मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. खरंतर म्युच्युअल फंड मध्ये Lumpsum म्हणजे एक रकमी गुंतवणुकीतून आणि सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीद्वारे गुंतवणूक करता येते.

यातील SIP हा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. एस आय पी मध्ये तुम्हाला दर महा एक ठराविक रक्कम गुंतवता येते. सध्या शेअर बाजाराच्या कामगिरीमुळे एसआयपीबद्दलही चिंता वाढली आहे, परंतु ही चिंता तात्पुरती आहे.

खरतर शेअर बाजारात सप्टेंबर 2024 पासून घसरण पाहायला मिळत आहे. याचा प्रभाव एसआयपी गुंतवणुकीवरही दिसून येत आहे. पण, अलीकडील काळात एसआयपीची लोकप्रियता मोठी वाढली आहे. SIP विशेषतः तरुणांमध्ये फारच लोकप्रिय आहे.

एसआयपी बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती कमी गुंतवणूकीसह देखील सुरू केली जाऊ शकते आणि यामुळे नियमित गुंतवणूकीची सवय विकसित होते. दरम्यान आज आपण सहा हजार रुपयांची एसआयपी सुरू करून पाच कोटी रुपयांचा फंड कसा तयार करायचा याबाबत माहिती पाहणार आहोत.

सहा हजाराच्या गुंतवणुकीतून मिळणार पाच कोटी रुपयांचा फंड

जर तुम्ही महिन्याला सहा हजार रुपयांचे एसआयपी सुरू केली आणि यावर तुम्हाला एव्हरेज 12 टक्के दराने परतावा मिळाला तर 40 वर्षांनी तुमची गुंतवणूक पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक होणार आहे.

चाळीस हजार रुपयांची एसआयपी केल्यास 12 टक्के दराने गुंतवणूकदारांना 5 कोटी 87 लाख 58 हजार 426 रुपये मिळणार आहेत. या 5.87 कोटी रुपयांमध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक फक्त 28.80 लाखांची राहणार आहे.

अर्थातच हजार रुपयाची एसआयपी मधून गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचे रिटर्न मिळणार आहेत. मार्केटमधील विश्लेषकांच्या माध्यमातून भविष्यात आर्थिक स्थैर्य हवे असेल, तर आजपासूनच गुंतवणुकीची शिस्त लावणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले आहे.

तसेच यासाठी म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा एक प्रभावी मार्ग असून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तो अत्यंत फायदेशीर ठरू शकतो असा दावा देखील जाणकारांनी केला आहे. तज्ञ सांगतात की, SIP च्या मदतीने दरमहा फक्त ₹6,000 गुंतवल्यास, 40 वर्षांत 5 कोटींहून अधिकची रक्कम जमा करता येऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe