Mutual Fund | SIP करायला निघालाय ? मग SIP किती वर्षांसाठी करावी, 2, 5, 10 की 20 वर्ष ? एक्सपर्ट सांगतात…..

म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील जोखीम आहेच मात्र जोखीमेचे प्रमाण शेअर मार्केट पेक्षा कमी आहे. दरम्यान शेअर मार्केट वर आधारित असल्याने म्युच्युअल फंड मध्ये देखील शेअर मार्केट प्रमाणेच मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतात.

Tejas B Shelar
Published:

Mutual Fund SIP : सिप म्हणजेच एसआयपी ज्याला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणून ओळखले जाते. अलीकडे एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळतोय.

सरासरी 12 ते 15 टक्के दराने म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकदारांना परतावा मिळत असून यामुळे अनेक जण आगामी काळातही एसआयपी करण्याच्या तयारीत आहेत. सध्या देशात एसआयपी करणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. परंतु एसआयपी करणारे बहुतांशी लोक हे छोटे गुंतवणूकदार आहेत.

ते आपल्या बजेटनुसार दरमहा हजार, दोन हजार, तीन हजार किंवा मग पाच हजार रुपयांची एसआयपी करून एक मोठा फंड बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण दहा हजाराची सुद्धा एसआयपी करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे पण लोकांना म्युच्युअल फंड आणि एसआयपी बाबत फारशी माहिती नसल्याची वास्तविकता सुद्धा आहे.

जे लोक एसआयपी करण्याच्या तयारीत आहेत त्यातील बहुतांशी लोकांचा पहिला प्रश्न असतो तो एस आय पी किती वर्षांसाठी केली पाहिजे? खरे तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आज आपण गुंतवणूकदारांनी किती वर्षांसाठी एसआयपी करायला हवी जेणेकरून त्यांना एक चांगला भरीव निधी मिळू शकतो याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सर्वप्रथम म्युच्युअल फंड हे शेअर बाजारावर आधारित आहे. परंतु ज्याप्रमाणे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना जोखीम उचलावी लागते तशी जोखीम म्युच्युअल फंड मध्ये नाही. पण म्युचल फंड मधील गुंतवणूक ही पूर्णपणे रिस्क फ्री सुद्धा नाही.

म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील जोखीम आहेच मात्र जोखीमेचे प्रमाण शेअर मार्केट पेक्षा कमी आहे. दरम्यान शेअर मार्केट वर आधारित असल्याने म्युच्युअल फंड मध्ये देखील शेअर मार्केट प्रमाणेच मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतात. म्हणजेच काही कालावधीमध्ये म्युच्युअल फंड चांगले रिटर्न देतात तर काही वेळा चांगले रिटर्न मिळत नाहीत.

काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना अगदीच 20 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न देतात तर काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना 12 टक्क्यांपेक्षाही कमी रिटर्न देतात. काही तर यापेक्षाही कमी रिटर्न देऊ शकतात. यामुळे या जोखीमेचे भान ठेवूनच लोकांनी यात गुंतवणूक करायला हवी. दरम्यान बाजारातील चढ-उतार पाहता एस आय पी हा अल्पकालावधीचा गेम नाही हे गुंतवणूकदारांनी आधी क्लिअर करून घेणे महत्त्वाचे आहे.

म्हणजे सहा महिने, एक वर्ष किंवा दोन वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एसआयपी हा एक योग्य पर्याय ठरू शकत नाही. कारण की एस आय पी मधून लॉन्ग टर्म मध्ये चांगला परतावा मिळतो, शॉर्ट मध्ये यातून फारसा परतावा मिळत नाही. म्हणून तज्ञ लोक सांगतात की एसआयपी मधून जर चांगला परतावा हवा असेल तर गुंतवणूकदारांनी यात किमान तीन वर्षांसाठी गुंतवणूक करायला हवी.

तसेच जर गुंतवणूकदारांना याहून अधिक चांगला परतावा हवा असेल तर त्यांनी पाच वर्षाहून अधिक काळासाठी यात गुंतवणूक करावी. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सलग दहा वर्ष किंवा वीस वर्षे एसआयपी केली तर अशा गुंतवणूकदाराला तीन वर्षे किंवा पाच वर्षे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांपेक्षा फारच अधिकचा परतावा मिळणार आहे. म्हणून एसआयपी किमान दहा वर्षासाठी किंवा वीस वर्षांसाठी करावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe