10 हजाराची SIP केल्यास 20 वर्षांनी किती रिटर्न मिळणार? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Mutual Fund हा गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार. यामध्ये गुंतवणूकदारांना दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते. Lumpsum म्हणजेच एकरकमी गुंतवणूक आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी च्या माध्यमातून दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवता येते. पण मध्यमवर्गीय लोक एकरकमी गुंतवणूक या ऐवजी एसआयपी करण्याला अधिक प्राधान्य दाखवतात. दरम्यान आज आपण म्युच्युअल फंड मध्ये 10 हजाराची एसआयपी केल्यानंतर गुंतवणूकदारांना किती परतावा मिळणार याबाबतचे कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत.

Tejas B Shelar
Published:

Mutual Fund SIP : भारतात अलीकडे गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी देशात बँकांची एफडी योजना तसेच पोस्ट ऑफिस, एलआयसीच्या बचत योजनांना विशेष प्राधान्य दाखवले जात आहे. यासोबतच अलीकडे काही गुंतवणूकदार अधिकचा परतावा मिळत असल्याने म्युच्युअल फंड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

दरम्यान जर तुम्हालाही लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड चा पर्याय बेस्ट ठरणार आहे. म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा मिळाला आहे आणि यामुळे या ठिकाणी अनेक जण गुंतवणूक करताना दिसत आहेत.

लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा एक बेस्ट पर्याय ठरणार आहे. दरम्यान आज आपण जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा दहा हजार रुपयाची एसआयपी सुरू केली तर त्याला वीस वर्षांनी किती रिटर्न मिळणार, सध्या एसआयपीवर गुंतवणूकदारांना कसे रिटर्न मिळत आहेत याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

SIP मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना सरासरी काय दराने परतावा मिळणार?

एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या सरासरी 12 टक्के दराने परतावा मिळत आहे. मात्र एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळत नाही. म्युच्युअल फंडच्या कामगिरी नुसार गुंतवणूकदारांना परतावा मिळत असतो.

पण सध्याची परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांना एव्हरेज 12 टक्के दराने परतावा मिळतोय. काही म्युच्युअल फंडने 12 टक्क्यांपेक्षाही अधिकचे रिटर्न दिलेले आहेत तर काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी फारसे फायद्याचे ठरलेले नाहीत.

दरम्यान जर गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड मधून एसआयपीवर 12% दराने परतावा मिळाला तर वीस वर्षांनी दहा हजार रुपये एसआयपी करणाऱ्यांना किती रिटर्न मिळणार याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.

10 हजाराची एसआयपी बनवणार करोडपती!

जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडमध्ये दरमहा दहा हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि त्यांना सरासरी 12 टक्के दराने परतावा मिळाला तर वीस वर्षांनी संबंधित गुंतवणूकदाराला 99.91 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

जर समजा गुंतवणूकदारांना 15 टक्के दराने परतावा मिळाला तर वीस वर्षांनी दहा हजार रुपये एसआयपी करणाऱ्याला 1.51 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. म्हणजेच दहा हजाराची एसआयपी सुरू केली आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला तर वीस वर्षांनी गुंतवणूकदार करोडपती होऊ शकतात.

मात्र म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही शेअर बाजारावर आधारित आहे यामुळे गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe