3000, 4,000 अन 5,000 रुपयांची एसआयपी सुरू केली तर किती वर्षांनी अडीच कोटीचा फंड तयार होणार?

भारतात अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्या लोकांना शेअर मार्केटचे विशेष ज्ञान नाही असे लोक सुद्धा आता म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवताना दिसत आहेत. कारण म्हणजे म्युच्युअल फंड मधून गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना एवरेज 12 ते 15 टक्के दराने परतावा मिळाला असून बँकेच्या एफडी योजनांपेक्षा आणि पोस्टाच्या बचत योजनांपेक्षा हा परतावा फारच अधिक आहे. दरम्यान तुम्ही Mutual Fund मध्ये एसआयपी करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला अडीच कोटी रुपयांचा फंड तयार करण्यासाठी तीन हजार, चार हजार आणि पाच हजार रुपयांची एसआयपी किती वर्ष सुरू ठेवावी लागणार याबाबत माहिती सांगणार आहोत.

Tejas B Shelar
Published:

Mutual Fund SIP : जर तुम्हालाही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा ठरणार आहे. आज आपण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी केल्यानंतर गुंतवणूकदारांना किती परतावा मिळतो याचा एक आढावा घेणार आहोत. खरेतर म्युचल फंड मध्ये दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते.

लम्सम म्हणजेच एक रकमी गुंतवणूक करता येते आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवता येते.

दरम्यान आज आपण म्युच्युअल फंड मध्ये तीन हजार, चार हजार आणि पाच हजार रुपयांची एसआयपी केल्यानंतर गुंतवणूकदारांना अडीच कोटी रुपयांचा फंड तयार करण्यासाठी किती वर्षे गुंतवणूक करावी लागणार? याबाबत माहिती पाहणार आहोत.

3 हजार रुपयांची एसआयपी केल्यास किती वर्षांनी अडीच कोटीचा फंड तयार होणार

जर म्युचल फंड मध्ये तीन हजार रुपयांची एसआयपी केली अन त्यांना यावर सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा मिळाला तर 37 वर्ष गुंतवणूक करावी लागणार आहे. तुम्ही दरमहा 3000 रुपये एसआयपीद्वारे गुंतवल्यास 37 वर्षानंतर वार्षिक 12 टक्के रिटर्न पकडल्यास अडीच कोटी रुपयांचा मोठा निधी तयार होणार आहे.

यात गुंतवणूकदाराची गुंतवणूक 13 लाख 32 हजार रुपयांची असेल अन त्यावर तुम्हाला भांडवली नफा 2 कोटी 34 लाख 91 हजार 534 रुपये मिळेल. म्हणजेच गुंतवणूकदाराला एकूण 2 कोटी 48 लाख 23 हजार 534 रुपये कॉर्पस मिळणार आहे.

त्यामुळे जर तुम्ही प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची एसआयपी सुरू करणार असाल तर तुम्हाला अडीच कोटी रुपयांचा फंड तयार करण्यासाठी सलग 37 वर्ष गुंतवणूक करायची आहे.

4000 रुपयांची एसआयपी केल्यास किती वर्षांनी अडीच कोटीचा फंड तयार होणार?

चार हजार रुपयांची एसआयपी केली आणि यावर 12 टक्के दराने एवरेज रिटर्न मिळाले तर 35 वर्षांनी अडीच कोटी रुपयांचा फंड तयार होणार आहे. चार हजार रुपयांची एसआयपी केल्यानंतर गुंतवणूकदारांना 35 वर्षांनी दोन कोटी 59 लाख 81 हजार 76 रुपये मिळणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक 16 लाख 80 हजार रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित रक्कम ही रिटर्न मिळणार आहे.

5 हजार रुपयांची एसआयपी केल्यास किती वर्षांनी अडीच कोटीचा फंड तयार होणार?

जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची एसआयपी केली अन त्यावर तुम्हाला सरासरी 12 टक्के दराने परतावा मिळाला तर 33 वर्षांनी तुम्हाला अडीच कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

दरमहा पाच हजार रुपयांची एसआयपी केल्यानंतर 33 वर्षांनी गुंतवणूकदारांना 12% दराने दोन कोटी 54 लाख 69 हजार 990 रुपये मिळणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदाराचे गुंतवणूक 19 लाख 80 हजार रुपयांची राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe