Mutual Fund SIP : अलीकडील काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेअर मार्केट आणि शेअर मार्केट वर आधारित असणाऱ्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना चांगला मोठा परतावा देखील मिळतोय.
दरम्यान आज आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून लवकरात लवकर लाखो रुपयांचा परतावा कसा मिळवायचा? याची माहिती पाहणार आहोत.
खरे तर म्युच्युअल फंड मध्ये दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते. एसआयपी करून म्हणजेच दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून यामध्ये गुंतवणूक करता येते तसेच Lumpsum म्हणजेच एकाचवेळी एक ठराविक रक्कम गुंतवता येते.
जर तुम्हाला येत्या तीन-चार वर्षात घर किंवा फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करायचा असेल आणि यासाठी तुम्हाला 50 लाख रुपयांचा फंड हवा असेल तर तुम्हाला दरमहा किती रुपयांची एसआयपी करावी लागणार? एस आय पी मधून 50 लाख रुपयांचा फंड किती गुंतवणुकीतून आणि किती कालावधीत तयार होणार याचीच सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
एक लाख रुपयांची SIP बनवणार मालामाल : जर गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड मध्ये दरमहा एक लाख रुपयांची एसआयपी केली तर तीन वर्ष आणि पाच महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 50 लाखांचा फंड तयार होईल. म्युच्युअल फंड मधील एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरासरी 12 टक्के दराने परतावा मिळतोय.
यानुसार दरमहा एक लाख रुपयांची एसआयपी केल्यास तीन वर्ष आणि पाच महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 52 लाख 39 हजार 778 रुपये मिळणार आहेत. यामध्ये 42 लाख रुपये सदर व्यक्तीची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित दहा लाख 39 हजार 778 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
75 हजार रुपयांची एसआयपी केल्यास किती वर्षात 50 लाख मिळणार : जर तुम्ही म्युच्युअल फंडच्या एसआयपी मध्ये दरमहा 75 हजार रुपयांची एसआयपी केली तर वार्षिक 12 टक्के दराने चार वर्षे आणि तीन महिन्यांच्या कालावधीत 50 लाख रुपयांचा फंड तयार होणार आहे.
वार्षिक 12 टक्के दराने दरमहा 75 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास चार वर्षे आणि तीन महिन्यांनी गुंतवणूकदारांना 50 लाख 83 हजार तेरा रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये 38 लाख 70 हजार रुपये ही गुंतवणूकदाराची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित 12 लाख 13 हजार 13 रुपये हे या गुंतवणुकीवरील व्याज राहील.