Mutual Fund SIP : म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर, अलीकडे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांना चांगला जबरदस्त परतावा मिळत असल्याने यात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
दरम्यान, आज आपण अशा चार म्युच्युअल फंडची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना गेल्या 20-25 वर्षांच्या काळात चांगला जबरदस्त परतावा मिळाला आहे. या म्युच्युअल फंड मध्ये फक्त 2,500 रुपयांची एसआयपी करूनही गुंतवणूकदार करोडपती बनले आहेत.

कोणते आहेत ते Mutual Fund?
एसबीआय हेल्थकेअर अपोर्ट्युनिटी फंड : हा Mutual Fund गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहे. हा फंड एक जुलै 1999 रोजी सुरू झाला आणि तेव्हापासून 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत एसबीआय हेल्थकेअर अपोर्ट्युनिटी फंडचे एयूएम 3417.11 कोटी रुपये इतके झाले. या फंडाने एसआयपी आणि Lumpsum गुंतवणूकीतुन गुंतवणूकदारांना उच्च परतावा दिला आहे.
या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांना एकरकमी कमीतकमी 5000 रुपयांची गुंतवणूक करता येते आणि यात किमान पाचशे रुपयांपासून एसआयपी करता येते. या म्युच्युअल फंडने गेल्या 25 वर्षांमध्ये SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांना वार्षिक 18.27% दराने परतावा दिला आहे.
म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने 25 वर्षांपूर्वी दरमहा 2500 रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर त्यांना आता 1.18 कोटी रुपयांचे रिटर्न मिळाले असते. दरम्यान एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षात या फंडने 57.32%, 3 वर्षात 24.01% दराने अन 5 वर्षात 29.5% दराने अन जेव्हापासून हा फंड लॉन्च झाला आहे तेव्हापासून गुंतवणूकदारांना यातून 17.12% दराने परतावा मिळाला आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड 19 ऑगस्ट 1999 रोजी सुरू करण्यात आला. या फंडाचे एयूएम 31 ऑक्टोबर, 2024 पर्यंत 14,347 कोटी रुपये होते. या फंडाने एसआयपी आणि लम्पसम गुंतवणूकीवरील गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. या फंडाने एसआयपी करणाऱ्यांना 25 वर्षात 18.54% दराने परतावा दिला आहे.
म्हणजेच दरमहा 2500 रुपये एसआयपी करणाऱ्यांना 25 वर्षात 1.23 कोटी रुपये मिळाले आहेत. Lumpsum गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षात या फंड मधून 27.7% दराने परतावा मिळाला आहे. तीन वर्षात 11.88% दराने परतावा मिळाला आहे. पाच वर्षात 18.25 टक्के दराने परतावा मिळाला आहे. लॉन्च झाल्यापासून 19.37 टक्क्यांनी परतावा मिळाला आहे.
SBI कंजप्शन अपॉर्च्युनिटीज फंड : या म्युच्युअल फंड मधून देखील गुंतवणूकदारांना गेल्या 25 वर्षांमध्ये चांगला परतावा मिळाला आहे. यामध्ये एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना 25 वर्षात 19.4 टक्के दराने परतावा मिळाला आहे. म्हणजेच यामध्ये 2500 रुपयांची दरमहा एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना 25 वर्षात 1.43 कोटी रुपये मिळाले आहेत.
लम्पसम गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या एका वर्षात या फंडाने 22.13% रिटर्न दिले आहेत तसेच तीन वर्षात या फंडने वार्षिक 21.26% दराने परतावा दिला आहे आणि पाच वर्षात 15.50% दराने परतावा दिला आहे. जेव्हापासून हा फंड सुरू झाला आहे तेव्हापासून गुंतवणूकदारांना Lumpsum गुंतवणुकीवर वार्षिक 15.44% परतावा मिळाला आहे.
ICICI प्रूडेंशियल FMCG फंड : 25 वर्षात एसआयपी करणाऱ्यांना या फंडने 17.93% दराने परतावा दिला आहे. अर्थातच यामध्ये दरमहा 2500 रुपये एसआयपी करणाऱ्यांना 25 वर्षात 1.11 कोटी रुपये मिळाले आहेत. लम्पसम गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या फंडने एका वर्षात 14.25%, तीन वर्षात 15.53% पाच वर्षात 14.08% दराने परतावा दिला आहे आणि जेव्हापासून हा फंड लॉन्च झाला आहे तेव्हापासून एकरकमी गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 16.52% दराने परतावा मिळाला आहे.