‘हा’ Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी ठरला फायदेशीर! 5 हजाराच्या एसआयपीतून मिळाले 2.64 कोटी

Published on -

Mutual Fund SIP : तुम्हीही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणार आहात का? अहो मग गुंतवणुकीआधी आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये काही म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने देखील आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 25 वर्षांमध्ये जोरदार रिटर्न दिले आहेत.

हा म्युच्युअल फंड पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झाला आणि या काळात या फंडात एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना वार्षिक 19 टक्के रिटर्न मिळाले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कधी सुरु झाला हा Mutual Fund ?

तारीख 3 मार्च 2000, याच दिवशी आयसीआयसीआय प्रुडेन्शियलची सुरवात झाली, अर्थात तीन मार्च 2025 ला सदर म्युच्युअल फंडाला तब्बल पंचवीस वर्षे पूर्ण होणार आहेत. दरम्यान या काळात म्हणजेच 25 वर्षांमध्ये या फंडाने एसआयपी करणाऱ्यांना वार्षिक 19 टक्के दराने परतावा दिला आहे.

एवढेच नाही तर एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यांना म्हणजेच Lumpsum इन्व्हेस्ट करणाऱ्या गुंतवणूकदारांना देखील गेल्या 25 वर्षांच्या काळात वार्षिक 12.98% दराने परतावा मिळाला आहे. या फंडाने एकरकमी गुंतवणूकदारांना 1 वर्षात 18.08 टक्के, 3 वर्षात 9.87 टक्के आणि 5 वर्षात 28.04 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

आता आपण या फंडात एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या पंचवीस वर्षांच्या काळात किती परतावा मिळाला आहे आणि दरमहा 3000 रुपये तसेच 5000 रुपये एसआयपी करणाऱ्यांना या काळात किती परतावा मिळाला आहे याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एकरकमी 1 लाख रुपये गुंतवणुकीतुन किती परतावा मिळाला

हा म्युच्युअल फंड जेव्हा सुरू झाला तेव्हा जर एखाद्या गुंतवणूकदाराने यामध्ये एक लाख रुपये एक रकमी गुंतवले असतील आणि ती रक्कम आत्तापर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर 12.98% दराने एक लाख रुपयांची रक्कम आता वीस लाख 97 हजार 900 इतकी झाली असेल.

तीन हजाराच्या एसआयपीने बनवले करोडपती

जर एखाद्या गुंतवणूकदाराने हा म्युच्युअल फंड सुरू झाल्यानंतर यामध्ये 3000 रुपयांची एसआयपी केली असेल तर म्हणजेच 25 वर्षांच्या काळात त्याला वार्षिक 19 टक्क्याने सुमारे 1.59 कोटी रुपये मिळाले असतील. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही नऊ लाखांची राहणार आहे.

5 हजाराच्या एसआयपीतून किती रिटर्न मिळालेत?

या म्युच्युअल फंडने एसआयपी करणाऱ्यांना गेल्या 25 वर्षांच्या काळात वार्षिक 19 टक्के दराने परतावा दिला आहे. अर्थात यामध्ये दरमहा 5,000 रुपयांची एसआयपी करणाऱ्यांना 25 वर्षात दोन कोटी 65 लाख 39 हजार 217 रुपये मिळालेत. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही फक्त 15 लाखाची आहे आणि उर्वरित रक्कम ही त्यांना व्याज म्हणून रिटर्न मिळाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe