Mutual Fund SIP : तुम्हीही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? अहो मग गुंतवणुकीपूर्वी आजची ही बातमी पूर्ण वाचा आणि मग गुंतवणुकीला सुरुवात करा. खरंतर भारतात गेल्या काही वर्षांत एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वेगाने वाढली आहे. पूर्वी गुंतवणूकदार सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याला पसंती दाखवत असत.
बँकेच्या एफडी योजनेत, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत असतं. मात्र आता शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक वाढली आहे. कारण म्हणजे येथून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्युच्युल फंड मध्ये एसआयपीद्वारे दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवता येते.
![Mutual Fund SIP](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Mutual-Fund-SIP-5.jpeg)
यात आपण दरमहा लहान बचत करून दरमहा गुंतवणूक करून एक मोठा फंड तयार करू शकता. या व्यतिरिक्त, ही योजना इतर सर्व योजनांच्या तुलनेत खूप चांगला परतावा देते. म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी केल्यास गुंतवणूकदारांना सरासरी 12% दराने परतावा मिळतोय.
याद्वारे आपण दीर्घ मुदतीमध्ये खूप मोठा निधी उभारू शकतो. मात्र एसआयपीचे सुद्धा काही प्रकार असतात. दरम्यान आज आपण एसआयपीचे हेच प्रकार समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी कोणती SIP फायदेशीर ठरेल याची निवड करता येईल.
SIP With Insurance : आपल्याला मोठा फंड तयार करायचा असेल आणि कुटुंबाचा विमा काढायचा असल्यास आपण SIP विद इन्शुरन्स हा पर्याय निवडू शकता. एसआयपीसह विमा म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (यूएलआयपी) किंवा विमासह एसआयपी. हे गुंतवणूक आणि विमा या दोहोंचा फायदा प्रदान करते. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांना विमा कव्हरसाठी स्वतंत्र प्रीमियम देण्याची गरज राहत नाही. एसआयपी कालावधीत गुंतवणूकदाराच्या अकाली मृत्यूवर, उमेदवाराला एक निश्चित विमा रक्कम मिळते.
ट्रिगर SIP : एस आय पी चा आणखी एक लोकप्रिय प्रकार म्हणजे ट्रिगर एस आय पी. या एसआयपी मध्ये केलेली गुंतवणूक ही थोडीशी रिस्की असते. असे गुंतवणूकदार जे मार्केट कोणत्या दिशेने झुकत आहे याचा अंदाज लावण्यात, मार्केटच्या ट्रेंडचा अंदाज लावण्यास तज्ज्ञ आहेत, ज्यांची जोखीम घेण्याची क्षमता जास्त आहे, असे लोक ट्रिगर एसआयपी निवडू शकतात.
यामध्ये, गुंतवणूकदार बाजारपेठेतील कार्यक्रमांवर आधारित त्यांच्या गुंतवणूकीसाठी ‘ट्रिगर’ सेट करू शकतात. जर आपल्याला सुलभ भाषेत सांगायचे झाले तर आपण ट्रिगर एसआयपीला अलार्मसारखे पाहू शकतो, जेव्हा आपली गुंतवणूक किंवा रिडेम्प्शनसाठी योग्य वेळ असेल तेव्हा ते वाजते. इंडेक्स लेव्हल ट्रिगर, निश्चित तारीख ट्रिगर, रिटर्न बेस ट्रिगर, नफा बुकिंग ट्रिगर इ. यासारखे अनेक प्रकारचे ट्रिगर असू शकतात.
स्टेप अप SIP : एसआयपीचा हा आणखी एक प्रकार. हा प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. ज्या लोकांना जास्तीत जास्त फंड तयार करायचा असतो, म्युचल फंड मधून अधिकाधिक रिटर्न मिळवायचे असतात ते लोक या एसआयपीमध्ये इन्व्हेस्ट करतात. ही एसआयपी एका निश्चित कालावधीनंतर वेतनवाढ मिळणाऱ्या पगारदार लोकांसाठी आणि दरवर्षी उत्पन्नात वाढ होणाऱ्या व्यावसायिक लोकांसाठी फायद्याची ठरते. या एसआयपी मध्ये वेळोवेळी गुंतवणुकीची रक्कम वाढवता येते.
फ्लेक्सिबल एसआयपी : SIP चा हा आणखी एक लोकप्रिय प्रकार. ही SIP अशा फ्रीलांसर, व्यवसायिक किंवा सेल्फ-एम्प्लॉईड लोकांसाठी फायद्याची ठरू शकते ज्यांचे उत्पन्न आणि खर्च अनिश्चित आहेत. ज्या लोकांना अचानक चांगला नफा आणि चांगली कमाई होते असे लोक फ्लेक्सिबल सिप मध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये, गुंतवणूकदारास एसआयपीची रक्कम बदलण्याचे स्वातंत्र्य असते. गुंतवणूकदार यामध्ये त्यांच्या उत्पन्नानुसार गुंतवणूकीची रक्कम कमी-जास्त करू शकतात. याला फ्लेक्सी सिप म्हणतात.
Regular SIP : जर तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवायची असेल आणि दीर्घ कालावधीत चांगला परतावा हवा असेल तर रेगुलर एसआयपी तुमच्यासाठी परफेक्ट राहणार आहे.