Mutual Fund SIP : जर तुम्हालाही तुमच्याकडील पैसा वाढवायचा असेल आणि यासाठी तुम्ही गुंतवणुकीच्या तयारीत असाल तर थांबा आजची ही बातमी पूर्ण वाचा आणि मग गुंतवणुकीचा निर्णय घ्या. खरंतर भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये आणि बँकेच्या एफडी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
मात्र सुरक्षित योजनांमधील गुंतवणूक ग्राहकांना फारसा परतावा देत नाही. यामुळेच अलीकडे गुंतवणूकदार शेअर मार्केट व म्युच्युअल फंड कडे वळू लागले आहेत. दरम्यान जर तुम्हीही आगामी काळात म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे.
![Mutual Fund SIP](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Mutual-Fund-SIP-6.jpeg)
कारण की आज आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून कशा तऱ्हेने कोट्याधीश होता येतं, फक्त दहा हजार रुपये महिन्याला SIP करून सात कोटी रुपयांचे रिटर्न कसे मिळणार याबाबतचे संपूर्ण कॅल्क्युलेशन अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर म्युच्युअल फंडमध्ये दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते पहिली म्हणजे लम्सम गुंतवणूक अर्थातच एकरकमी गुंतवणूक आणि दुसरी म्हणजे एसआयपीद्वारे गुंतवणूक. गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसआयपीतून जवळपास वार्षिक 12 टक्के दराने परतावा मिळालेला
आहे.
काही फंडातून गुंतवणूकदारांना 15 टक्के दराने सुद्धा परतावा मिळाला आहे. यामुळे अलीकडे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आता आपण दहा हजार रुपयांची एसआयपी करून कशा पद्धतीने करोडोंचा फंड तयार होऊ शकतो याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.
10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?
दहा हजार रुपयांची एसआयपी केली आणि यावर ऍव्हरेज 12 टक्के दराने परतावा मिळाला तर गुंतवणूकदारांना दहा वर्षांनी 23,23,391 इतके रिटर्न मिळणार आहेत यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही बारा लाख रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित रक्कम ही गुंतवणूकदाराला रिटर्न म्हणून मिळणार आहे.
20 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार
गुंतवणूकदारांनी दहा हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि यावर ऍव्हरेज 12 टक्के दराने परतावा मिळाला तर त्यांना वीस वर्षांनी 99 लाख 91 हजार 479 रुपये मिळणार आहेत. यात गुंतवणूकदाराचे गुंतवणूक फक्त 24 लाखाची राहणार आहे आणि उर्वरित रक्कम त्याला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहे.
30 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार
दहा हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि यावर ऍव्हरेज 12 टक्के दराने परतावा मिळाला तर तीस वर्षांनी संबंधित गुंतवणूकदाराला तीन कोटी 52 लाख 99 हजार 138 रुपये रिटर्न मिळणार आहेत. यामध्ये संबंधित गुंतवणूकदाराची गुंतवणूक फक्त 36 लाखांची राहणार आहे आणि उर्वरित रक्कम ही व्याज स्वरूपात रिटर्न म्हणून मिळणार आहे.
36 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?
दहा हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि त्यावर अवरेज 12 टक्के दराने परतावा मिळाला तर 36 वर्षांनी गुंतवणूकदाराला सात कोटी 33 लाख 18 हजार 411 रुपये मिळतील. यात गुंतवणूकदाराची गुंतवणूक फक्त 43 लाख 20 हजार रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित रक्कम ही त्याला रिटर्न मिळणार आहे.