Nagar New Expressway : पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आता आणखी एका महामार्गाने कनेक्ट होणार आहे. सहकाराची पंढरी अहिल्यानगर जिल्ह्यातून 442 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. कल्याण ते लातूर असा हा द्रुतगती महामार्ग राहील.
खरे तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातील काही महामार्गांचे काम आधीच पूर्ण झाले आहे तर काही महामार्गांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच काही प्रकल्प मंजुरीच्या प्रतिक्षत आहेत.

दरम्यान कल्याण लातूर महामार्गाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या आणि अखेर राज्य सरकारने याला हिरवा कंदील दिलाय. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान वेगवेगळ्या प्रकल्पांचा आढावा घेतला आहे. नागपुरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी या महामार्गाला मंजुरी दिली.
त्यांच्या या निर्णयामुळे या महामार्ग प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली असून येत्या काही दिवसांनी या महामार्गाचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली की मग पुढे या महामार्गाचा आराखडा तयार होईल आणि तो प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी सरकारकडे जमा होईल.
याला मंजुरी मिळाल्यानंतर मग या प्रकल्पासाठी जमीनदीकरणाचे काम सुरू होईल, निविदा प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर या प्रकल्पासाठीची वर्क ऑर्डर जारी होणार आहे. साधारणता येत्या एक दीड वर्षात या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान जेव्हा या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल तेव्हा कल्याण ते लातूर हा प्रवास फक्त चार तासांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या स्थितीला वाहतूक कोंडीमुळे कल्याण ते लातूर हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 11 तासांचा वेळ खर्च करावा लागतोय. नक्कीच हा महामार्ग कल्याण लातूर प्रवासासाठी गेम चेंजर ठरणार आहे यात शंकाच नाही.
या प्रकल्पामुळे व्यापार उद्योग, पर्यटन, कृषी, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना दिलासा मिळणार आहे. या एक्सप्रेस वे मुळे मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरातील संपर्क लातूर, बीड आणि सबंध मराठवाड्यासोबत चांगला वेगवान होण्याची शक्यता आहे. आता आपण थोडक्यात या महामार्गाचा रूट समजून घेऊयात.
कसा असणार रूट?
या महामार्गाच्या रूट बाबत बोलायचं झालं तर याची सुरुवात कल्याण येथून होणार आहे पुढे हा माळशेज घाटातून अहिल्यानगर – बीड – मांजरसुंबा – अंबाजोगाई मार्गे लातूर पर्यंत जाणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्र कर्नाटक सीमेपर्यंत जाणार आहे.
यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्यांसाठी देखील हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्प अंतर्गत माळशेज घाटात जवळपास आठ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे आणि यामुळे माळशेज घाटातील वाहतूक सुद्धा अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.
विशेष म्हणजे हा मार्ग विरार–अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉरला जोडला जाणार असाही दावा केला जातो. म्हणजेच भविष्यात सबंध मुंबई महानगरक्षेत्रातील नागरिकांचा मराठवाड्याकडील प्रवास अधिक वेगवान सुरक्षित आणि कोंडी मुक्त होणार आहे. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि लातूर हे दोन्ही जिल्हे रस्ते मार्गाने आणखी जवळ येतील.













