शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! मयत व्यक्तीची जमीन 15 दिवसात नावावर होणार, असा करा अर्ज

Published on -

Nagar News : व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याची जमीन त्याच्या कायदेशीर वारसाला मिळते. पण यासाठी कायदेशीर वारसाला वारस नोंदणी करावी लागते.

थोडक्यात मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

या प्रक्रियेला अनेकजण वारस नोंदणी किंवा फेरफार करून नाव लावणे असे म्हणतात. पण ही प्रक्रिया नेमकी कशी करायची ? याचीच माहिती आज आपण येथे घेणार आहोत.

15 दिवसात जमीन नावावर 

व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या नावावर असणाऱ्या जमिनीचे पुढील पिढीकडे हस्तांतरण होते. हे हस्तांतरण करताना त्या संबंधित व्यक्तीचा मृत्यू दाखला आवश्यक असतो.

मृत्यू दाखला हा नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीतून मिळतो. हा दाखला काढणे वारस नोंदणी प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. याच दाखल्याच्या आधारावर पुढे वारस दाखला काढावा लागतो.

जर मयत व्यक्तीच्या नावावर असणाऱ्या जमिनीवरून वाद असतील तर अशा प्रकरणात वारस दाखला काढताना स्थानिक सिविल कोर्टात अर्ज करून न्यायालयीन आदेशाने वारस हक्क प्रमाणपत्र काढावे लागते.

पण जर जमिनीबाबत कोणतेच वाद विवाद नसतील तर तहसील कार्यालयात जाऊन हा दाखला काढता येतो. यानंतर मग संबंधित कायदेशीर वारसाला दोन्ही कागदपत्रे घेऊन फेरफार नोंदणीसाठी तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागतो.

अर्ज करताना मृत्यू दाखला, वारस दाखला, सातबारा उतारा, आधार कार्ड अन वारसाची सहमतिपत्रे जोडावे लागतात. यानंतर तलाठी फेरफार नोंद घेतो आणि याचा क्रमांक दिला जातो.

ही नोंद ई सातबारा प्रणालीवर सुद्धा दिसते. फेरफार मंजूर झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीत सातबारा उताऱ्यावर नवीन नाव दिसते.

जर मयत व्यक्तीच्या नावावर असणाऱ्या जमिनीवरून वाद विवाद नसतील तर ही प्रक्रिया फारच सोपी आहे. पण जर संबंधित जमिनीवरून वादविवाद असतील तर अशावेळी प्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते आणि अशा प्रकरणात अधिकचा वेळ जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe