कोपरगाव मार्गे भुसावळ – पुणे एक्सप्रेस सुरू होणार? महाव्यवस्थापकांना निवेदन सादर

Published on -

Nagar News : खानदेश अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. रेल्वे प्रशासनाने भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेसला अमरावती पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतलाय.

आता ही गाडी कल्याण, पनवेल सोडून कोपरगाव – दौंड मार्गे चालवली जाते. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यापासून जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

हा विस्तार जिल्ह्यातील प्रवाशांसाठी तोट्याचा ठरला आहे. त्यामुळे अनेकांच्या माध्यमातून आता भुसावळ ते पुणे दरम्यान स्वातंत्र्य एक्सप्रेस चालवण्याची मागणी केली जात आहे.

यासाठी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू आहे. भुसावळ पुणे अशी नवीन गाडी मनमाड कोपरगाव दौंड या मार्गाने चालवण्याची मागणी उपस्थित करण्यात आली आहे.

या मागणीच्या अनुषंगाने मध्य रेल्वे विभागाच्या महाव्यवस्थापकांना प्रवासी संघटनांच्या माध्यमातून एक सविस्तर निवेदन सुद्धा सादर करण्यात आले आहे.

खरंतर भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस जळगाव जिल्हा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी फारच उपयोगाची ठरत होती. या गाडीमुळे या परिसरातील उद्योजक विद्यार्थी नोकरदार मंडळी यांना मोठा दिलासा मिळत होता.

परंतु काही महिन्यांपासून ही गाडी अमरावती पर्यंत चालवली जाऊ लागली आणि या निर्णयाचा जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना फटका बसलाय. नाशिक, पनवेल, कल्याणकडे जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना फारच मनस्ताप सहन करावा लागतोय.

आता या लोकांना मनमाड येथे उतरून इतर गाड्यांनी प्रवास करावा लागतो. यामुळे पुन्हा एकदा भुसावळ – पुणे एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

रेल्वे प्रशासनाला याच निवेदन सुद्धा मिळाल आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांना अलीकडेच पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाच्या शिष्टमंडळाने स्वातंत्र पुणे – भुसावळ एक्सप्रेस सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe