ब्रेकिंग ! शिर्डीसह राज्यातील ‘या’ 17 नगरपालिकांवर आता SC कॅटेगिरीमधील महिला होणार नगराध्यक्ष, वाचा डिटेल्स

Published on -

Nagar Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. अरे तर आज नगरपालिकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. प्रभाग रचना आधीच करण्यात आली होती पण आरक्षण जाहीर झाले नसल्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक होती. विशेष म्हणजे आरक्षणामुळे राजकीय समीकरणे देखील फायनलाईज होत नव्हती.

पण आता आरक्षण जाहीर करण्यात आले असल्याने महाविकास आघाडी तसेच महायुती मधील राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहेत. संपूर्ण आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही पण याचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. या पहिल्या टप्प्यात एस सी कॅटेगिरी म्हणजेच अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असणाऱ्या 17 नगरपालिकांच्या नावांची घोषणा केली आहे.

या घोषणेमुळे आता राजकीय पक्षांच्या तयारीला वेग येणार अशी माहिती दिली जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यातील 17 नगरपालिका या अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी व सहा नगरपालिका या अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्थात आदिवासी महिलांसाठी राखीव आहेत.

दरम्यान आता राज्य सरकारकडून आरक्षण जाहीर करण्यात आले असल्याने राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करतांना दिसणार आहेत. खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल समोर आल्यानंतर राजकीय पक्षांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी कधीच सुरू केली आहे.

आतापर्यंत तरी महायुती व महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवण्याच्या अनुषंगानेच तयारी केलेली आहे. तसा दावा वेळोवेळी महायुती व महाविकास आघाडी मधील वरिष्ठ नेत्यांकडून केला जातोय. कार्यकर्ते सुद्धा तसेच म्हणत आहेत. पण अद्याप याबाबत दोन्ही गटांकडून अधिकृत माहिती काही देण्यात आलेले नाही.

आरक्षणामुळे महायुती आणि महाविकास आघाडी सेपरेट लढणार की एकत्रित लढणार याचे चित्र अजून क्लियर झालेले नाही. पण आता आरक्षण हळूहळू जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर या सर्व गोष्टी क्लियर होणार आहेत. महायुती संदर्भात बोलायचं झालं तर महायुती मधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाने महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे.

शिंदे गट लहान भाऊ म्हणून कमी जागांवर सुद्धा निवडणूक लढवेल, पण महायुती म्हणूनच निवडणूक झाली पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. एकीकडे शिंदे गट महायुतीसाठी इच्छुक आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने आणि अजित पवार गटाकडून या संदर्भात अजून तरी कोणताच प्रतिसाद दाखवण्यात आलेला नाही.

पण अजित पवार गट व भाजपा हे एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतील अशी शक्यता आहे. दरम्यान आता आपण कोणत्या नगरपालिकांवर अनुसूचित जाती आणि कोणत्या नगरपालिकांवर अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना आरक्षण देण्यात आले आहे याबाबत माहिती पाहूयात. 

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित 

शिरोळ 

देऊळगावराजा

मोहोळ

तेल्हारा

ओझर

वानाडोंगरी

भुसावळ

घुगुस

चिमूर

शिर्डी

सावदा

मैंदरगी

डिगदोहदेवी

डिग्रस

अकलूज

परतूर

बीड

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित 

वणी

भडगाव

पिंपळनेर

उमरी

यवतमाळ

शेंदूर जना घाट

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News