Nagar Railway News : अहिल्यानगर, नाशिकसहित उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी तिरुपती बालाजी येथे दर्शनाला जाणाऱ्या भक्तांसाठी खास ठरणार आहे.
खरे तर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रातून अर्थात शिर्डी वरून तिरुपती बालाजी साठी स्पेशल गाडी सुरू करण्यात आली होती. या स्पेशल गाडीला भाविकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद दाखवण्यात आला असून आता ही स्पेशल गाडी नियमित करण्यात आली आहे.

तिरुपती आणि शिर्डी ही देशातील दोन प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत. तिरुपती ते शिर्डी दरम्यान दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. दरम्यान शिर्डीहुन तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
उत्तर महाराष्ट्रासह विविध राज्यांतील भक्तांना अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तिरुपती–शिर्डी रेल्वेला नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खरेतर, या गाडीच्या फेऱ्या वाढाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर या मार्गावरील रेल्वे सेवेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
यामुळे मंत्री भुजबळ यांचा पाठपुरावा यशस्वी झाला आहे. खरंतर, या गाडीसाठी मंत्री भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांना पत्राद्वारे विनंती केली होती. या मागणीला प्रतिसाद देत उद्यापासून अर्थातच 9 डिसेंबर पासून तिरुपती साईनगर शिर्डी ही साप्ताहिक रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे.
ही रेल्वेगाडी नियमित धावणार असून यामुळे तिरुपती ते शिर्डी असा प्रवास वेगवान होणार आहे. आतापर्यंत या मार्गावर फक्त एक साप्ताहिक गाडी सुरू होती मात्र, आता आणखी एक साप्ताहिक गाडी सुरू होणार असल्याने याचा भाविकांना मोठा फायदा होणार आहे.
ही गाडी शिर्डीतून सोडली जाणार असून नगरसुल रेल्वे स्थानकावर सुद्धा या गाडीला थांबा देण्यात आला आहे. अर्थातच या निर्णयाचा फायदा नाशिक जिल्ह्याला सुद्धा होणार आहे. या मार्गावर आता नियमित गाडी धावणार असल्याने तिकीट दर 1.3 पट कमी होणार आहे.













