मोठी बातमी ! नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गात मोठा बदल, आता ‘या’ शहरातून होणार शक्तीपीठ Expressway ची सुरुवात

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचा विकास करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. मात्र, या प्रोजेक्टचा शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जातोय. मात्र शासनाने हा महामार्ग प्रकल्प तयार करण्यासाठी पुन्हा एकदा हालचाली वाढवल्या आहेत. अशातच आता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

Published on -

Nagpur Goa Expressway : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठी घोषणा केली आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग केला काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. खरंतर हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचा विकास करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे.

मात्र, या प्रोजेक्टचा शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जातोय. या महामार्गात बागायती जमिनी बाधित होणार असल्याने आणि आधीच चांगला मार्ग असतानाही शक्तीपीठ महामार्ग का असे म्हणत अनेकांनी या मार्गाचा विरोध केला आहे. या महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त विरोध पाहायला मिळतोय.

मात्र शासनाने हा महामार्ग प्रकल्प तयार करण्यासाठी पुन्हा एकदा हालचाली वाढवल्या आहेत. अशातच आता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. खरे तर हा प्रकल्प राज्यातील अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्र जोडणार आहे.

हा प्रकल्प राज्यातील तीन महत्त्वाची शक्तीपीठे जोडणार आहे. दरम्यान आता नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाची सुरूवात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. फडणवीस यांनी विधिमंडळात ही माहिती दिली आहे.

खरे तर शक्तिपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांब राहणार आहे. 802 किलोमीटरच्या या मार्गामुळे विदर्भ व मराठवाड्याची कनेक्टीविटी वाढणार असून या दोन्ही भागाच्या विकासासाठी हा नवा एक्सप्रेस वे प्रकल्प एक मैलाचा दगड ठरणार आहे.

या प्रकल्पामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास वेगवान होणारच आहे शिवाय राज्यातील अध्यात्मिक पर्यटनाला देखील मोठी चालना मिळणार आहे. शक्तीपीठ महामार्गमुळे कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणूका माता हे राज्यातील तीन शक्तिपीठ एकमेकांना रस्ते मार्गाने कनेक्ट होणार आहेत.

शिवाय, अंबेजोगाईची योगेश्वरी माता, परळी वैजनाथ, औंढा नागनाथसह अशी असंख्य तीर्थक्षेत्र सुद्धा एकमेकांशी जोडली जाणार आहेत. हा महामार्ग पर्यटनासोबतच मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. हा मार्ग 12 जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रातील 11 आणि गोव्यातील एका जिल्ह्याला या महामार्गामुळे एक स्ट्रॉंग कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे समृद्धी महामार्गाशी वर्धा जिल्ह्याला जोडल्या नंतर आता शक्तीपीठ महामार्ग देखील जिल्ह्यातून जात असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हा महामार्ग प्रकल्प राज्यातील यासंबंधीत 11 जिल्ह्यांमधील कृषी उद्योग शिक्षण अध्यात्म आणि पर्यटन अशा सर्वच क्षेत्रासाठी मोठा फायद्याचा राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe