Nagpur Nashik Railway : नागपूर ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर विदर्भातून उत्तर महाराष्ट्राकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रदरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये म्हणूनच प्रवाशांची संख्या नेहमीच अधिक पाहायला मिळते.
या मार्गावरील कित्येक गाड्या हाउसफुल धावतात. त्यामुळेच आता रेल्वे प्रशासनाने नागपूरहून नाशिक साठी एकेरी विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या एकेरी विशेष रेल्वे गाडीच्या एकूण दोन फेऱ्या होणार आहेत.

यामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील जनतेचा नाशिककडील प्रवास वेगवान आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे. दरम्यान आता आपण या एकेरी विशेष गाडीच्या वेळापत्रकाची तसेच ही गाडी कुठे थांबा घेणार याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
कस राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर – नाशिक एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेन 23 आणि 24 जुलै 2025 रोजी नागपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. 23 आणि 24 जुलैला नागपूर रेल्वे स्थानकातून ही गाडी संध्याकाळी साडेसात वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता ही गाडी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
नागपूर ते नाशिक असा प्रवास पूर्ण करण्यासाठी या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला एकूण दहा तास लागणार आहेत. ही एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेन अनारक्षित आहे. म्हणजेच ज्या प्रवाशांनी अचानक प्रवासाचा प्लॅन बनवला आहे त्यांच्यासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.
खरंतर नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांना आधीच बुकिंग करून ठेवावे लागते कारण की रेल्वे गाड्या हाऊसफुल होतात. अशा परिस्थितीत ज्या लोकांनी अचानक नाशिकला जाण्याचा बेत आखला असेल त्यांच्यासाठी ही गाडी खास ठरणार आहे.
या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार विशेष गाडी
नागपूर – नाशिक एकेरी विशेष रेल्वे गाडी अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव,
मनमाड जंक्शन या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अर्थातच ही गाडी विदर्भातील 10 आणि उत्तर महाराष्ट्रातील चार महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे.