मोठी बातमी ! नागपूर – सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या ‘या’ टप्प्याचे कॉंक्रिटीकरण होणार, 61 कोटी रुपये मंजूर

Published on -

Nagpur Surat Highway : नागपूर – सुरत राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गाचा काही भाग आता काँक्रीट चा होणार असून या चार पदरी कॉंक्रिटीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून चांगला भरून निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नागपूर–सुरत राष्ट्रीय महामार्ग (NH 53) हा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणारा एक महत्त्वाचा महामार्ग आहे. विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जनतेला या महामार्गामुळे गुजरातला जाणे सोपे झाले आहे.

मात्र या महामार्गातील धुळे जिल्ह्यातील काही भाग पूर्णपणे खराब झाला असून हाच खराब झालेला भाग आता रिपेअर केला जाणार आहे. फागणे येथील अमळनेर चौफुली ते धुळे शहरातील पारोळा चौफुलीपर्यंतचा सुमारे साडेपाच किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून चार पदरी केला जाणार आहे.

तसेच हा रस्ता कॉंक्रीटचा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. खरे तर या महामार्गाची झालेली जीर्ण अवस्था पाहता या कामासाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी केंद्र सरकारकडे जोरदार पाठपुरावा केला होता आणि आता आमदार महोदयांचा हाच पाठपुरावा यशस्वी झाला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या महत्त्वाच्या कामास अलीकडेच मंजुरी दिली असून, तब्बल 60 कोटी 55 लाख 62 हजार 123 रुपयांच्या निविदा प्रक्रियेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येत्या 365 दिवसांमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की , नागपूर–सुरत महामार्गाचा बहुतांश भाग चार पदरी करण्यात आला. पण जिल्ह्यातील फागणे ते पारोळा चौफुलीपर्यंतचा हा टप्पा गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होता. मोठमोठे खड्डे, सततची वाहतूक आणि खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

विशेषतः फागणेजवळील कोती नदीचा पूल, अन्वर नाल्याचा पूल तसेच आणखी एका पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली होती. अपघातांची शक्यता वाढली होती आणि हा मार्ग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला होता. यामुळे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी निधी मंजुरीची मागणी उपस्थित केली.

यानुसार आता या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हे काम पूर्ण होईल अशी आशा आहे. या प्रकल्पांतर्गत अमळनेर चौफुली ते पारोळा चौफुलीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे चारपदरी काँक्रिटचा बांधण्यात येणार आहे.

यासोबतच कोती नदीवर नवीन पूल, अन्वर नाल्यावर नवीन पूल तसेच अन्य एका पुलाचेही नव्याने बांधकाम होणार अशी माहिती देण्यात आली आहे. महामार्गालगत गटारी, पथदीप, रस्तेचिन्हे व अन्य पूरक कामांचाही समावेश असेल.

नक्कीच ही सारी कामे पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावरचं राहणार आहे. धुळे शहरातील पारोळा चौफुली आणि मुंबई–आग्रा महामार्गावरील रेसिडेन्सी पार्क परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी ही मोठी समस्या होती.

बाह्य वळणरस्त्यावर एकेरी व नंतर दुहेरी वाहतूक सुरू केल्यानंतर काही प्रमाणात कोंडी कमी झाली होती. आता फागणे ते पारोळा चौफुली चारपदरी रस्त्याचे काम सुरू झाल्याने या भागातील वाहतूक सुरळीत होणार असून, धुळेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News