‘या’ अक्षरांची नावं असलेली लोकं असतात प्रचंड दृढनिश्चयी, आत्मविश्वासाने अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करतात

वैदिक ज्योतिष शास्त्रात 9 ग्रह, बारा राशी आणि 27 नक्षत्रांना फारच महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे ग्रहांना आणि ताऱ्यांना महत्त्व आहे तेवढेच महत्त्व नावाला सुद्धा देण्यात आले आहे.

Published on -

Name Personality : हिंदू सनातन धर्मात 16 संस्कारांना विशेष महत्त्व आहे आणि या 16 संस्कारांमध्ये नामकरण सोहळा हा सर्वात मोठा संस्कार समजला जातो. नामकरण सोहळ्याला नवीन जन्माला आलेल्या बालकाला एक युनिक असं नाव दिलं जातं. खरे तर नामकरण सोहळा पूर्ण झाल्यानंतर बालकाला एक वेगळी ओळख मिळते. ते बाळ एका विशिष्ट नावाने समाजात, आपल्या कुटुंबात ओळखलं जात.

पण तुम्हाला माहिती आहे का वैदिक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या नावाला सुद्धा महत्त्व आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात जेवढे ग्रह आणि ताऱ्यांना महत्त्व आहे, अंकशास्त्रात जेवढे अंकांना म्हणजेच जन्मतारीख, जन्म महिना, जन्माचे वर्ष या साऱ्या गोष्टींना जेवढे महत्त्व आहे तेवढेच शास्त्रात नावाला सुद्धा महत्त्व देण्यात आले आहे.

से म्हणतात की नावावरून कोणत्याही व्यक्तीचे भूत, वर्तमान आणि भविष्य अधोरेखित होत असते. संपूर्ण नावच नाही तर पहिल्या नावाचं पहिलं अक्षर हे सुद्धा व्यक्तीची संपूर्ण जन्मकुंडली सांगते.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक अक्षर कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी संबंधित असते आणि यामुळे नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व अधोरेखित होत असते. दरम्यान आज आपण M या इंग्रजी अक्षरापासून ज्या लोकांची नावे सुरू होतात त्या व्यक्तींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसं असतं याबाबत जाणून घेणार आहोत.

कसा असतो स्वभाव ?

ज्योतिष शास्त्रात असे सांगितले गेले आहे की इंग्रजी वर्णमालेतील M या अक्षरापासून ज्या लोकांचे नाव सुरू होते ते लोक प्रचंड आत्मविश्वासी असतात. या लोकांच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आलं तरी देखील ते अगदीच दृढपणे ते संकट पार करतात, आव्हानांचा सामना करतात.

या लोकांचा आत्मविश्वास त्यांना कठीण काळात देखील शांत राहण्यासाठी मदत करतो आणि हे लोक केवळ आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावरच अगदीच अवघड परिस्थितीतून मार्ग काढण्यात सक्षम ठरतात.

रिस्क घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत

जिथे जेवढी अधिक रिस्क असते तिथे यशस्वी होण्याचे प्रमाणही अधिक असते. हे लोक याच सूत्राचा अवलंब करतात आणि रिस्क घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत. जोखीम घेणे हे प्रत्येकाचे काम नसते, परंतु M अक्षर असलेले लोक जोखीम घेण्यास घाबरत नाहीत.

करिअरशी संबंधित निर्णय असो किंवा वैयक्तिक निर्णय असो, हे लोक जोखीम घेण्यास कधीच मागेपुढे पाहत नाहीत. हेच कारण आहे की, काही प्रसंगी या लोकांना एवढे मोठे यश मिळते की अनेकांना यावर विश्वास सुद्धा बसत नाही.

नेतृत्वगुणांमुळे बनतात उत्तम लीडर

ज्योतिष शास्त्र असे सांगते की हे लोक फारच दृढनिश्चयी असतात, एकदा ध्येय निश्चित केल की ते कधीही मागे वळून पाहत नाहीत. ते कठोर परिश्रम, समर्पण आणि वचनबद्धतेने काम करतात आणि यशस्वी होईपर्यंत थांबत नाहीत आणि याचमुळे या लोकांचा सक्सेस होण्याचा रेशो हा इतरांपेक्षा जास्त दिसतो.

या लोकांमध्ये नेतृत्व गुण असतो ज्यामुळे ते उत्तम लीडर बनतात. क्षेत्र कोणतेही असो या लोकांची लीडरशिप यशस्वी होतेच. या लोकांमध्ये असणारी मॅनेजमेंटची स्किल, टीमला मोटिवेट करण्याची क्षमता या लोकांना एक उत्तम लीडर बनवते हे आपण मान्यच करायला हवे.

हे लोक अगदीच नारळासारखे असतात असं आपण म्हणू शकतो कारण की हे लोक बाहेरून मजबूत आणि दृढनिश्चयी दिसतात पण आतून ते तेवढेच भावनिक असतात. ते त्यांच्या नात्याला गांभीर्याने घेतात आणि त्यांच्या प्रियजनांसाठी काहीही करण्याची क्षमता ठेवतात. मात्र ते आपल्या भावना कंट्रोल मध्ये ठेवण्याची क्षमता राखतात आणि यामुळेच ते आपल्या आयुष्यात इतरांपेक्षा लवकर आणि चांगले यश मिळवतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News