ब्रेकिंग : डिसेंबरच्या ‘या’ तारखेला मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता

Updated on -

Namo Kisan Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पीएम किसान सन्मान निधी अन नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की महाराष्ट्रात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेप्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. म्हणजेच राज्यातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे एकूण 12,000 रुपये मिळतात.

दरम्यान, गेल्या एका आठवड्यापासून राज्यातील शेतकरी बांधव नमो शेतकरीच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 19 नोव्हेंबर रोजी या योजनेचा 21 वा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची वाट पाहिली जात होती आणि अखेरकार हा हप्ता 19 तारखेला पात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे आता राज्यातील शेतकरी नमो शेतकरीच्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

खरे तर पी एम किसान च्या 21 व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी चा आठवा हप्ता सुद्धा वितरित करण्यात येईल अशा चर्चा सुरू होत्या. मात्र नमो चा आठवा हप्ता अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

नमो चा सातवा हप्ता देखील पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यानंतरच देण्यात आला होता. पी एम किसान्याचा 21 व्या हप्ता जमा होऊन आता एक आठवड्याचा काळ पूर्ण झाला आहे यामुळे नमोचा आठवा हप्ता कधी येणार हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

कधी मिळणार नमो शेतकरीचा आठवा हप्ता

खरंतर पीएम किसानचा हप्ता जमा झाला की साधारणतः पंधरा दिवसांनी नमोचा हप्ता जमा होतो. यावेळी पीएम किसानचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आला आहे यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नमोचा आठवा हप्ता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतरच राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल असे बोलले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपली की त्यानंतर मग राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता मिळू शकतो. नमो शेतकरीचा आठवा हप्ता हा 20 डिसेंबरच्या आत पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

नमोचा हफ्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकार सगळ्यात आधी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरून नमो शेतकरीच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवते. ही यादी प्राप्त राज्य शासना दरबारी आली की मग पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केला जातो.

त्यानंतर मग या निधी वितरणासाठी एक विशिष्ट शासकीय निर्णय (जीआर) जारी केला जात असतो. शासन निर्णय जारी झाल्यानंतर साधारणपणे 15 दिवसांच्या आत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe