Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर अलीकडेच पीएम किसान चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला आहे.
पी एम किसानचा 21 वा हफ्ता गेल्या वर्षाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.

महत्त्वाची बाब म्हणजे पुढल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान चा 22 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.
पण पीएम किसानच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी चा हप्ता अजून पण राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील या योजनेची लाखो लाभार्थी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पीएम किसान चा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसात नमो शेतकरीचा हप्ता वर्ग होतो. पण यावेळी नमोचा हप्ता एक महिना उलटल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात शासनाच्या विरोधात नाराजी आहे.
खरे तर सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणधुमाळी सुरू आहे आणि याच निवडणुकीचा नमोच्या हप्ता वितरणावर परिणाम होत आहे.
अशा स्थितीत नमोचा हप्ता नेमका शेतकऱ्यांना कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान आता आपण याबाबत डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
कधी मिळणार शेतकऱ्यांना पैसे ?
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
तसेच या मतदानाचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सध्या राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने सरकारला कोणत्याही आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करता येत नाही.
यामुळे नमो किसान चा हप्ता जोवर महापालिका निवडणुकांसाठी आचारसहिता आहे तोवर मिळणार नाही. पण आचारसंहिता संपली की या योजनेचा लाभ मिळू शकतो.
आता 16 तारखेला आदर्श आचारसंहिता संपेल आणि त्यानंतर नमो किसानच्या लाभार्थ्यांना पैसे मिळतील. यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. पण अद्याप सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही यामुळे या योजनेचा लाभ नेमका कधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.













