नाशिकमध्ये घर खरेदीची सुवर्णसंधी…! 14 लाखांमध्ये ‘या’ भागात मिळणार हक्काच घर, वाचा सविस्तर

Published on -

Nashik News : अलीकडे मुंबई, नाशिक, पुणे अशा महानगरात घर खरेदी करणे फारच अवघड बाब बनली आहे. या शहरात म्हाडाच्या घरांची मागणी अन किंमत खूपच वाढली आहे. दरम्यान आता नाशिक शहरात हक्काचे घर शोधणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे नाशिक शहरात शेकडो घरी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 402 निवासी सदनिकांची आगाऊ अंशदान (Advance Contribution) तत्वावरील विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया ‘गो लाईव्ह’ कार्यक्रमातून सुरू झाली असून, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यालय वांद्रे (पूर्व) येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जयस्वाल यांनी सांगितले की, सन 2025 मध्ये नाशिक मंडळाने यापूर्वी तीन सोडतींद्वारे 846 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. दरम्यान अलीकडेच जाहीर करण्यात आलेली ही चौथी सोडत आहे.

Mhada अधिकाधिक परवडणारी घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक म्हाडा मंडळाकडून सोडत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या नाशिक मंडळाच्या सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या अर्जदारांनी सदनिकेची किंमत पाच टप्प्यांमध्ये भरणे अपेक्षित राहणार आहे. 

कुठं आहेत सदनिका ?  

नाशिक मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या या लॉटरीत अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 293 घरे आहेत. अल्प उत्पन्न गटात चुंचाळे येथे 138 घरे, पाथर्डी येथे 30 घरे, मखमलाबाद येथे 48 घरे आणि आडगाव येथे 77 घरे आहेत. 

यां लॉटरीत मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) 108 सदनिका आहेत. यातील 40 घरे सातपूर येथे, 35 घर पाथर्डी येथे आणि 34 घरे आडगाव येथे आहेत. 

घरांच्या किमती कशा आहेत ?

म्हाडा नाशिक मंडळाच्या या लॉटरीमध्ये समाविष्ट घरांच्या किमती 14 लाख रुपयांपासून सुरू होतात. या लॉटरी मधील सर्वात स्वस्त घर 14 लाख 94 हजार 23 रुपयांना आहे तर सर्वात महागडे घर 36 लाख 75 हजार 23 रुपयांना आहे. तुम्हाला घरांच्या किमती बाबत अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायला हवी.

अर्ज कुठे करावा लागणार? 

इच्छुकांनी https://housing.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करावा. इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच अर्ज करणे अपेक्षित आहे.

म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून घरांसाठी कोणताच दलाल किंवा एजंट नमूद करण्यात आलेला नाही. यामुळे कोणीही थर्ड पार्टीच्या माध्यमातून नोंदणी करण्याचा प्रयत्न करू नये स्वतः अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.

म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरच नोंदणी करणे नागरिकांसाठी सुरक्षित ठरणार आहे नाहीतर त्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. दरम्यान आता आपण नाशिक मंडळाच्या या लॉटरीचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत.

कस आहे वेळापत्रक  

अर्ज व अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा : 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत.

RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरणा : यासाठी 24 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे. या तारखेपर्यंत नागरिकांना बँकेच्या वेळेत आपली अनामत रक्कम भरता येईल.

स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी : 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता.

ऑनलाइन हरकती सादर करण्यासाठीची मुदत : 30 डिसेंबर पासून ते 2 जानेवारी 2026 पर्यंत. 

पात्र अर्जदारांची अंतिम यादी कधी  : सहा जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर होणार अशी माहिती समोर आली आहे. 

सोडतीचा दिनांक : या घरांसाठी संगणकीय सोडत कधी जाहीर होणार याची डेट अजून निश्चित झालेली नाही पण येत्या काळात बोर्डाकडून ही डेड फायनल केली जाईल आणि आपल्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच एसएमएसच्या माध्यमातून अर्जदारांना याबाबत माहिती पुरवली जाईल असे सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News