नाशिकच्या रिंग रोड प्रकल्पालाबाबत नवं अपडेट ! ‘ह्या’ ४ पॅकेजेससाठी तांत्रिक निविदा खुल्या, एकूण ७ पॅकेजेसमध्ये होणार काम

Published on -

Nashik Ring Road : सध्या संपूर्ण महाराष्ट्र रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. जुन्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे, तर काही ठिकाणी नवीन प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान राज्यातील अनेक शहरांमध्ये रिंग रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत. नाशिक मध्ये देखील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे अनुषंगाने रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान ह्याच महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पाला आता मोठी गती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा खुल्या केल्या आहेत.

नाशिक रिंग रोडच्या एकूण ७ पॅकेजेसपैकी ४ पॅकेजेससाठी तांत्रिक निविदा उघडल्या असून, यामध्ये ६६.२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा समावेश असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.

या निविदा प्रक्रियेला देशातील नामांकित बांधकाम कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, एकूण ९ कंपन्यांनी विविध पॅकेजेससाठी निविदा सादर केल्या आहेत.

पॅकेजनिहाय निविदादार कंपन्या

पॅकेज क्रमांक २ :

व्ही.एच. खत्री कन्स्ट्रक्शन प्रा. लि.

जी.आर. इन्फ्राप्रोजेक्ट्स लि.

पॅकेज क्रमांक ४ :

जीएचव्ही इंडिया प्रा. लि.

व्ही.एच. खत्री कन्स्ट्रक्शन प्रा. लि.

पॅकेज क्रमांक ६ :

एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स लि.

श्रीजी इन्फ्रास्पेस प्रा. लि.

पॅकेज क्रमांक ७ :

ए.एस. देसाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.

व्ही.एच. खत्री कन्स्ट्रक्शन प्रा. लि.

उर्वरित पॅकेजेससाठी निविदा कधी निघणार

दरम्यान, पॅकेज क्रमांक १, ३ आणि ५ साठीच्या तांत्रिक निविदा येत्या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या टप्प्यानंतर आर्थिक निविदा उघडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

नाशिकसाठी महत्त्वाचा प्रकल्प

नाशिक रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असून, शहराला वळसा घालून जाणाऱ्या जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमी होईल, प्रवासाचा वेळ व इंधन खर्च वाचेल तसेच औद्योगिक व व्यापारी विकासाला चालना मिळेल.

हा प्रकल्प राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा विकास धोरणातील महत्त्वाचा भाग असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून या प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले जात आहे.

एकूणच, नाशिक रिंग रोड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला वेग मिळाल्याने नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी मानली जात असून, प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News