Nashik To Borivali : उत्तर महाराष्ट्रातील नाशिकहुन मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत नाही. ही बातमी नाशिक ते बोरिवली असा प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की या मार्गावर आता एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ही बस समृद्धी महामार्गावरून धावणार आहे. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गामुळे नाशिक ते मुंबई हा प्रवास वेगवान झाला आहे. दरम्यान आता मुंबई ते बोरिवली अशी नवीन बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बोरिवली ते नाशिकदरम्यान एसटीची नवी इलेक्ट्रिक वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली असून, या मार्गावरील प्रवास आता अधिक वेगवान, आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
समृद्धी एक्सप्रेसवे मार्गे धावणारी ही बस प्रवाशांचा किमान एक तास प्रवास वाचवणार आहे. या मार्गावर ई-एसी बस सुरू करण्याची मागणी काही महिन्यांपासून होत होती. संभाजीनगर-दादर-पुणे आणि नाशिक–छत्रपती या यशस्वी सेवांनंतर आता नाशिक–बोरिवली मार्गावरील मागणी पूर्ण करत एसटी महामंडळाने दररोज 22 फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
बोरिवलीहून नाशिककडे पहिली बस पहाटे 5 वाजता सुटते, तर शेवटची बस सायंकाळी 5 वाजता उपलब्ध आहे. नाशिकहून बोरिवलीकडे पहिली बस सकाळी 6 वाजता आणि शेवटची सायंकाळी 5.30 वाजता सुटते.
विशेष म्हणजे या बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीचा पण लाभ मिळणार आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिला प्रवाशांना बोरिवली–नाशिक ई-एसी बसने प्रवास फक्त 266 रुपयांत करता येणार आहे.
पुरुषांसाठी तिकीटदर 509 रुपये निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी उपलब्ध असलेल्या जुन्या सेवेत प्रवास वेळ जास्त असल्याने आणि भाडे 430 ते 652 रुपयांदरम्यान असल्याने नवी सेवा अधिक परवडणारी ठरणार आहे.
या नव्या बस सेवा समृद्धी एक्सप्रेसवे मार्गे धावणार असल्याने प्रवास वेळेत मोठी बचत होणार आहे. विशेषतः इगतपुरी ते पडघा या 81 किमीच्या अंतरासाठी फक्त 70 मिनिटे लागतात.
मात्र, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कधीकधी प्रवासात काहीसा विलंब करू शकते. MSRTC च्या अधिकृत वेबसाइट व मोबाइल रिझर्वेशन अॅपद्वारे तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे.
प्रवाशांना सीट निवड, वेळापत्रक आणि भाडे याची संपूर्ण माहिती ऑनलाइन सहज उपलब्ध होणार आहे. या नव्या ई-एसी बस सेवेमुळे बोरिवली–नाशिकदरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार असून, प्रवाशांना स्वच्छ, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे.













