Navi Mumbai News : मुंबई, नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये घर घेणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अस झालंय. सर्वसामान्यांना या महानगरांमध्ये घर घेताना मोठा कसं लावावा लागतोय. आपल्याकडे साठवलेला सर्व पैसा जमवूनही घर घेता येत नाही. अशा या परिस्थितीत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न सिडको आणि म्हाडा प्राधिकरणाकडून पूर्ण केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने मुंबईमधील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. यासाठी लाखो लोकांनी अर्ज देखील केले आहेत. यामुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान आता नवी मुंबईत घर शोधू इच्छिणाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

सिडको प्राधिकरणाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी सणासुदीच्या दिवसांमध्ये आनंदाची बातमी हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिडको प्राधिकरण नवरात्र उत्सवाच्या काळात तब्बल 26000 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे.
खरे तर मुंबईनजिक विकसित होणाऱ्या नवी मुंबई परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढत आहे. त्यामुळे सिडको प्राधिकरण नवी मुंबई मधील हजारो घरांसाठी दरवर्षी सोडत जारी करत असते. यंदाही प्राधिकरणाच्या माध्यमातून 26 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे.
खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून सिडको प्राधिकरणाच्या लॉटरीची चर्चा सुरू आहे. मात्र अजून ही लॉटरी जाहीर झालेली नाही. पण आता ही लॉटरी लवकरच जाहीर होणार आहे. नुकतीच सिडकोची बोर्ड मीटिंग संपन्न झाली असून यामध्ये सिडकोच्या 26000 घरांसाठी 7 ऑक्टोबरला लॉटरी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजत आहे.
संजय शिरसाठ यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लॉटरीची प्रतीक्षा पाहिली जात होती ती प्रतीक्षा आता संपणार आहे. दरम्यान शिरसाठ यांनी पुढील मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे लवकरच सिडको प्राधिकरणाच्या या हजारो घरांसाठी जाहिरात निघणार हे स्पष्ट होत आहे.
7 ऑक्टोबरला या घरांसाठी जाहिरात निघेल आणि त्या दिवसापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता देखील आहे. यामुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न आगामी काळात पूर्ण होणार आहे. नवरात्र उत्सवा दरम्यान या घरांसाठी लॉटरी निघेल आणि त्यानंतर या लॉटरीची पुढील प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती सध्या समोर येत आहे.