ग्वाल्हेर ते बेंगलोर दरम्यान धावणार नवीन एक्सप्रेस ! महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. दरम्यान, आज आपण याच नव्या एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोण - कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार याची डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ग्वाल्हेर ते बेंगलोर दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार असून ही गाडी महाराष्ट्रातून धावणार आहे. या गाडीला महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत आता आपण या नव्या एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे राहणार? ही गाडी राज्यासहित या मार्गावरील कोणकोणत्या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार? याबाबतची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक?

ग्वाल्हेर ते बेंगलोर दरम्यान चालवली जाणारी ही नवीन एक्सप्रेस ट्रेन उत्तर भारताला आणि दक्षिण भारताला जोडणारी आहे. या नव्या एक्सप्रेस ट्रेन मुळे ग्वाल्हेर ते बेंगलोर दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे शिवाय ही गाडी विदर्भातून चालवली जाणार आहे यामुळे विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी देखील ही गाडी फायद्याची ठरणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

ही एक साप्ताहिक गाडी राहणार असून विदर्भातील नागपूर रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिसूचनेत या गाडीच्या वेळापत्रकाची माहिती देण्यात आली आहे यानुसार गाडी क्रमांक 11086 म्हणजे ग्वाल्हेर-बेंगळुरू रेल्वेगाडी ही शुक्रवारी 15.00 वाजता ग्वाल्हेर रेल्वे स्थानकावरून सोडले जाणार आहे आणि रविवारी ही गाडी सात वाजून 35 मिनिटांनी बेंगलोर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक 11087 म्हणजेच बेंगलोर ग्वाल्हेर रेल्वे गाडी बेंगलोर वरून रविवारी 15.50 वाजता आणि मंगळवारी एक वाजून 25 मिनिटांनी ग्वाल्हेर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन एक्सप्रेस ट्रेन?

ही गाडी महाराष्ट्रातून धावणार असून राज्याच्या विदर्भ विभागातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या नव्या एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील शिवपुरी, गदुणा, अशोकनगर, बिना, विदिशा, भोपाळ, बैतुल, नागपूर, सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशा, सिरपूर कागजनगर, बेलमपल्ली, काझीपेठ, काचीगुडा, महबूबनगर, गडवाल, कर्नुल, ढोणे, अनंतपूर, धर्मावरण, हिंदुपूर, येलंखा या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!