महाराष्ट्राला मिळणार 40,000 कोटीचा नवा एक्सप्रेस वे ! पुणे, सातारा, सांगली सहित ‘या’ भागातून जाणार, कसा असणार रूट ?

राज्याला लवकरच एका नवीन एक्सप्रेस वे ची भेटणार आहे. या नव्या एक्सप्रेस वे मुळे मुंबई ते बेंगलोर हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. सध्या या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करायचे असल्यास जवळपास 18 तासांचा वेळ लागतो. मात्र नव्या एक्सप्रेस वे च्या निर्मितीमुळे हा प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण हा नवीन एक्सप्रेस वे प्रकल्प नेमका कसा आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत.

Published on -

New Expressway : महाराष्ट्राला भविष्यात आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामुळे देशातील रस्त्यांचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. खरेतर, केंद्रातील मोदी सरकारकडून भारतमाला परियोजना सुरू करण्यात आली आहे.

आता याच योजनेतून मुंबई ते बेंगलोर हा नवा एक्सप्रेस वे विकसित होणार आहे. या नव्या एक्सप्रेस वे मुळे मुंबई ते बेंगळुरू प्रवास अवघ्या 6 तासांत शक्य होईल असा दावा सुद्धा केला जात आहे. दरम्यान, आज आपण या नव्या एक्सप्रेस वे ची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

18 तासांचा प्रवास 6 तासात 

नव्याने घोषित करण्यात आलेल्या या एक्सप्रेस वे ची बांधणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहे. हा नवीन एक्सप्रेस वे एन एच ए आय कडून विकसित होणार असून हा 14 लेनचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे राहणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे या नव्या एक्सप्रेस वे मुळे प्रवाशांचा प्रवास हा फारच वेगवान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा हा नवा एक्सप्रेस वे कम्प्लीट होईल तेव्हा मुंबई ते बेंगलोर 18 तासांचा प्रवास जवळपास 12 तासांनी कमी होणार आहे.

म्हणजेच मुंबई ते बेंगलोर यादरम्यान अवघ्या सहा तासात प्रवास करता येणार आहे. कारण म्हणजे हा महामार्ग ऍक्सेस-कंट्रोल्ड म्हणजेच प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे. अर्थातच या मार्गावर काही ठराविक वाहणांनाच एन्ट्री राहणार आहे.

हा नवा महामार्ग फक्त वेगवान वाहनांसाठी राहील, यामुळे या नव्याने विकसित होणाऱ्या महामार्गावर वाहन चालकांना 120 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहने चालवता येणार आहेत.

कसा असणार नवा एक्सप्रेस वे ? 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विकसित होणाऱ्या नव्या महामार्गाबाबत बोलायचं झालं तर हा 700 किलोमीटर लांबीचा महामार्ग राहणार असून यावर 22 इंटरचेंज, 55 उड्डाणपूल आणि दोन आपत्कालीन लँडिंग स्ट्रिप्स बांधण्यात येणार आहेत. या नव्या महामार्गासाठी जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हा मार्ग पुणे रिंगरोडमार्फत मुंबई-पुणे एक्सप्रेसवेशी जोडला जाणार अशी माहिती समोर आली आहे. हा महामार्ग पुणे व बेंगळुरू या महत्त्वाच्या आयटी शहरांना थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे पुणे ते बेंगळुरू हे अंतर सुमारे 95 किमीने कमी होईल.

नवा एक्सप्रेस वे कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार?  

हा नवा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे. या नव्या प्रस्तावित एक्सप्रेस वे ची सुरुवात ही पुणे रिंग रोडवरून होईल, कंजाळे या गावातून या नव्या एक्सप्रेस वे ची सुरुवात होणार आहे आणि पुढे मग हा एक्सप्रेस पुणे सातारा व सांगली जिल्ह्यातून कर्नाटकमध्ये जाईल.

कर्नाटक राज्यातील बेलगावी, बागलकोट, गडग, कोप्पळ, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर, बेंगळुरू ग्रामीण या भागातून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला असून शेवटी हा मार्ग बेंगळुरू शहरात जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe