New GST Slab:- येणारे दिवस आता सणासुदीचे असून या दिवसांमध्ये सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटीच्या स्लॅबमध्ये काही बदल करण्यात आले. अगोदर यामध्ये चार स्लॅब होते व त्यापैकी 12% आणि 28% चा स्लॅब रद्द करण्यात आलेला आहे व आता फक्त पाच आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब असणार आहेत. यामुळे आता अनेक जीवनावश्यक वस्तू तसेच इतर काही वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत झालेली आहे व त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे. टाटा आणि महिंद्राच्या काही कार देखील यामुळे स्वस्त झालेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक जणांना प्रश्न पडला असेल की या बदलामुळे मोबाईल देखील स्वस्त होणार का? तर याच प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात बघणार आहोत.
जीएसटी बदलामुळे मोबाईल स्वस्त होणार का?
सणासुदीच्या कालावधीमध्ये आणि घरगुती उपकरणे तसेच वाहने आणि मोबाईल फोन खरेदी करण्याचा ट्रेंड आपल्याला भारतामध्ये दिसून येतो. अशाप्रसंगी जीएसटीमध्ये जे बदल करण्यात आले त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त झालेले आहेत. परंतु यामध्ये मोबाईल फोन मात्र स्वस्त झालेले नाहीत. कारण यापूर्वी मोबाईल फोनवर 18 टक्क्यांचा जीएसटी लागू होता आणि तितकाच जीएसटी नवीन कर स्लॅबमध्ये देखील ठेवण्यात आलेला आहे. यामुळे मोबाईलच्या किमतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे. याप्रसंगी मोबाईल उत्पादक कंपन्यांनी अगोदरच स्पष्ट केलेले होते की जर कराचा दर पाच टक्क्यांपर्यंत आणला गेला तरच मोबाईलच्या किमतीमध्ये ग्राहकांना दिलासा मिळू शकेल. परंतु याबाबत कुठल्याही पद्धतीचा निर्णय झाला नसल्यामुळे मोबाईल स्वस्त होण्याच्या आशा आता धुसर झालेल्या आहेत.

जीएसटी कौन्सिलने आणला 40 टक्क्यांचा नवीन स्लॅब
जीएसटी कौन्सिलच्या माध्यमातून जीएसटी स्लॅबमध्ये बदल केले असून आता दोनच स्लॅब ठेवण्यात आलेले आहेत. परंतु या व्यतिरिक्त एक नवीन 40 टक्क्यांचा स्लॅब यामध्ये जीएसटी कौन्सिलने मात्र जाहीर केलेला आहे. यामुळे मोठी वाहने तसेच तंबाखूजन्य पदार्थांसारख्या वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचे समोर आलेले आहे. मोबाईलच्या बाबतीत बघितले तर सणासुदीच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जातो. परंतु या जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनंतर देखील मोबाईलच्या किमती जैसे थे राहणार आहेत.