मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रो 1 ‘या’ दिवशी धावणार; असे राहतील तिकीट दर

Published on -

New Mumbai Metro News :  मुंबई आणि उपनगरात वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते मार्ग बळकट करण्याचे काम सुरू आहे. यासोबतच लोहमार्ग देखील विस्तारले जात आहेत.

यामध्ये लोकलचा विस्तार केला जात आहे. मुंबईची लाईफ लाईन अर्थात मुंबई लोकल आता मोठ्या प्रमाणात विस्तारण्यात आली आहे. सोबतच मेट्रोचे देखील शहरात काम सुरू आहे. अशातच आता नवी मुंबई वासियांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे.

हे पण वाचा :- Punjabrao Dakh Havaman Andaj : अहमदनगर कर इकडे लक्ष द्या ! ह्या दिवशी येणार पाऊस…वाचा पंजाब डख यांचा हवामान अंदाज

ही गुड न्यूज आहे मेट्रो एक मार्गाच्या कामासंदर्भात. हाती आलेल्या माहितीनुसार मेट्रो एक चे काम हे पूर्ण झाले आहे. सिडकोच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता मेट्रो एक मार्ग या महिन्याच्या म्हणजेच एप्रिल 2023 च्या अखेर पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. यामुळे निश्चितच नवी मुंबई वासियांना जलद आणि आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे. पेंधर ते बेलापूर यादरम्यान काम सुरु होत आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सिडकोच्या माध्यमातून एकूण चार मेट्रो मार्ग तयार केले जात आहेत. यापैकी पेंदर ते बेलापूर यादरम्यान चे काम तांत्रिक अडचणींमुळे सिडकोने महामेट्रोच्या हाती दिले होते. आता हे काम महामेट्रोच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले असून या महिन्याच्या अखेरपर्यंत या रूट वर मेट्रो धावणार आहे. यामुळे नवी मुंबई वासियांची गेल्या अनेक वर्षांची मेट्रोची इच्छा पूर्ण होणार आहे.

हे पण वाचा :- शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! महिलांना बसमध्ये प्रवास करताना मिळणार …

आपल्या माहितीसाठी आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा हा बेलापूर ते पेंढार हा 11.1 किमीचा मार्ग आहे. या रूट दरम्यान 11 स्थानके आहेत आणि तळोजा यां ठिकाणी कार डेपो आहे. बेलापूर ते पेंढार या फेज-1 च्या कामाचे कंत्राट महामेट्रोला देण्यात आले होते. आता हा मेट्रो मार्ग एप्रिल अखेर सुरू होणार आहे. अशा परिस्थिती आज आपण मेट्रो ने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किती तिकीट लागणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

असे राहतील मेट्रो मार्गाचे तिकीट दर

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रो एक ने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पहिल्या दोन किलोमीटरसाठी दहा रुपये, दोन किलोमीटर ते चार किलोमीटर 15 रुपये, चार ते सहा किलोमीटर वीस रुपये, सहा ते आठ पंचवीस रुपये, आठ ते दहा तीस रुपये, तसेच दहा किलोमीटर साठी अधिकचे चाळीस रुपये द्यावे लागणार आहेत. 

हे पण वाचा :- Aajcha Havaman Andaj : आज पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला अलर्ट, जाणून घ्या ताजे अपडेट्स !

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News