New Pay Commission : वर्ष 2025 सरकारी नोकरदार मंडळीसाठी मोठे फायद्याचे ठरणार असून पुढल्या वर्षी या नोकरदार मंडळीच्या पगारात वाढ होणार आहे. तब्बल दहा वर्षानंतर या सरकारी नोकरदार मंडळीला एक मोठी भेट मिळणार आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून नवीन वेतन आयोग लागू करण्याची मागणी जोर धरत आहे.
यासाठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला जातोय. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकारी नोकरदार मंडळीला लागू असणारा सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला होता. आतापर्यंत जेवढे वेतन आयोग लागू झाले आहेत ते दहा वर्षांच्या गॅपने लागू झालेत.
म्हणजे दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. पहिला वेतन आयोग हा 1946 मध्ये लागू झाला होता. यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झालाय. यानुसार आता 2026 मध्ये नवीन आठवावेतन आयोग लागू होणे अपेक्षित असून यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार पाठपुरावा केला जात आहे.
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी आठवा वेतन आयोग लागू होईल अशी अपेक्षा कर्मचारी संघटनांनी होती. मात्र निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने याबाबतचा निर्णय घेतला नाही. नंतर अर्थसंकल्पाच्या काळात आठवा वेतन आयोगाच्या चर्चा रंगल्या होत्या.
मात्र यासंदर्भात अर्थसंकल्पात देखील निर्णय झाला नाही. पण आता पुढल्या वर्षी याबाबत सकारात्मक निर्णय होणार असे वृत्त हाती आले आहे. पुढील वर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकार आठवा वेतन आयोगाची घोषणा करणार असे बोलले जात आहे.
2025 मध्ये आठवा वेतन आयोग स्थापित होईल आणि त्यानंतर एक जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केला जाईल असा दावा सध्या मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय. तथापि या संदर्भात केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
यामुळे खरंच केंद्रातील मोदी सरकार याबाबतचा सकारात्मक निर्णय घेणार का आणि पुढील वर्षी आठवा वेतन आयोग स्थापित होणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे. त्याआधी मात्र आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पगार कितीने वाढणार?
सध्याच्या ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्क्यांनी वाढ झाली होती. म्हणून आता ८ व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार म्हणजेच मूळ वेतन ३४,५०० रुपये केले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या किमान मूळ वेतन १८,००० रुपये आहे. म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा थेट दुप्पट होणार आहे.