महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! या शहरात तयार होणार 7 नवीन Railway Station

Published on -

New Railway Station : कोणत्याही राष्ट्राच्या, राज्याच्या विकासात तेथील पायाभूत सुविधा महत्त्वाची भूमिका निभावतात. हेच कारण आहे की गत काही वर्षांमध्ये राज्यातील पायाभूत सुविधा सक्षम बनवण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून रेल्वेच्या माध्यमातून देशभरात नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. आधीच अस्तित्वात असणाऱ्या रेल्वे मार्गांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांचे दुहेरीकरण, तिहेरीकरण व चौपदरीकरण केले जात आहे.

मुंबईसारख्या शहरांमध्ये तर रेल्वेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आता रेल्वेने मुंबई शहरातील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे या नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या मार्गांवर सात नवीन रेल्वे स्टेशन उभारली जाणार आहेत. विरार डहाणू या रेल्वेमार्गाचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून चौपदरीकरण करण्यात येत असून याच प्रकल्पात नवीन सात स्थानके विकसित करण्यात येणार आहेत. हा मार्ग 64 किलोमीटरचा आहे.

या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी 3578 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येईल. आतापर्यंत या प्रकल्पाचे 41 टक्के काम झाले आहे. बाकी राहिलेले काम सुद्धा युद्ध पातळीवर केले जात आहे.

आता जसे काम सुरू आहे तसे काम सुरू राहिले तर साधारणता 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. खरेतर, विरार स्थानकातून दररोज सहा लाख प्रवासी प्रवास करतात.

तसेच डहाणू येथून दररोज अडीच लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात. अशा स्थितीत या मार्गावर तयार होणारी नवीन स्थानके प्रवाशांसाठी मोठी फायद्याची ठरणार आहेत. यामुळे विरार – डहाणू असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान आता आपण या रेल्वे मार्गावर सध्या किती स्थानके आहेत आणि नव्याने विकसित केली जाणारी सात स्थानके कोणती असतील या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

सध्याची स्थानके कोणती ?

वैतरणा

सफाळे

केळवे रोड

पालघर

उमरोली

बोईसर 

वाणगाव

नव्याने विकसित होणाऱ्या स्टेशनची नावे 

वाढीव

सरतोडी

माकुणसार

चिंतुपाडा

पांचाळी

वंजारपाडा

बीएसईएस कॉलनी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News