राज्याला मिळणार 166 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वेमार्ग ! आज सुरु होणार नवीन रेल्वेसेवा, ह्या रेल्वे स्टेशनंवर थांबा घेणार

Published on -

New Railway : अहिल्यानगर मधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज राज्याला 166 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. अहिल्यानगर – बीड असा हा मार्ग आहे.

या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीड शहर रेल्वेच्या नकाशावर येण्याची वाट पाहत होते. आता अखेरकार बीड रेल्वेच्या नकाशावर आले आहे.

यामुळे बीडकरांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतय. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड – अहिल्यानगर मार्गावर रेल्वे धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही रेल्वे सेवा सुरू होईल.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार सुद्धा उपस्थित असतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. यामुळे चाळीस वर्षांचे बीडवासीयांचे स्वप्न आता प्रत्यक्षात खरे उतरणार आहे.

अहिल्यानगर – बीड – परळी असा हा 261 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे. या मार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच अहिल्यानगर – बीड आता सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. अर्थात परळीमधील जनतेला रेल्वेसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

या रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील काही कामे अजूनही बाकी आहेत. यामुळे आता हा दुसरा टप्पा नेमका कधी सुरू होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहील. खरेतर या रेल्वे मार्गाला 1995 मध्ये तांत्रिक मान्यता मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाचा खर्च 355 कोटी होता.

मात्र या रेल्वे मार्गाचे काम वेगवेगळ्या कारणांमुळे रखडले. आज या प्रकल्पाचे काम 4800 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्य सरकार आणि निम्मा खर्च केंद्र सरकार करत आहे. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर अहिल्यानगर – बीड प्रवास फक्त 45 रुपयांमध्ये पूर्ण होईल.

या मार्गावर सुरुवातीला डिझेलवर रेल्वे चालवली जाणार आहे. विद्युतीकरणाची कामे पूर्ण झालीत की मग विजेवर रेल्वे धावेल. अहिल्यानगरमधून सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी रेल्वे सोडली जाणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात बीड रेल्वे स्थानकातून दुपारी एक वाजता रेल्वे सोडली जाणार आहे. 

कोणत्या स्थानकावर थांबणार रेल्वेगाडी 

नारायणडोह

लोणी

सोलापूरवाडी

धानोरा 

कडा

आष्टी

अमळनेर (भांड्याचे)

रायमोह

एगनवाडी

जाटनांदूर

राजुरी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe