केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात सामान्यांना चांगलाच दिलासा दिला आहे. आयकराचा टप्पा वाढवून तो थेट १२ लाखांपर्यंत वाढवला आहे. आयकराचा हा नवीन स्लॅब सर्वांनाच दिलासा देणारा आहे. गेल्या पंचवार्षिकला म्हणजेच २०२० मध्ये सरकारने नवी करप्रमाणीली आणली होती. त्यात जुन्या करप्रणालीत अनेक सूट दिल्या होत्या. आताही यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वात चर्चेत असणारी सूट म्हणजे गृहकर्ज… गृहकर्ज घेणाऱ्यांना आता तब्बल दोन लाखांचा फायदा होईल, असे विश्लेषक सांगत आहेत.
नव्या करप्रणालीचे फायदे कोणते
नव्या करप्रणालीचे प्रमुख सात फायदे सांगितले जातात. त्यात NPS अंतर्गत सूट, अग्निपथ योजनेअंतर्गत सूट, कौटुंबिक पेन्शन, स्टॅन्डर्ड डिडक्शन, सेवानिवृत्तीचा लाभ, कंपनीकडून मिळणाऱ्या भत्त्यावर सूट, गिफ्टवर सूट आदींचा त्यात समावेश होतो. गिफ्टवर सूट या नव्या प्रणालीचा चांगलाच फायदा होणार आहे. म्हणजे वर्षभरात तुम्ही एखाद्याकडून 50 हजारांपर्यंत भेटवस्तू घेतल्या तरी त्यावर कोणताच कर आकारला जाणार नाही.

होमलोनमध्येही होणार फायदा
नव्या करप्रणालीत सर्वसामान्यांना दिलेला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे होमलो. सरकारने होम लोनच्या व्याजदरावर सूट देऊन मोठा फायदा करुन दिला आहे. आता ही सवलत प्रत्यक्ष स्वरुपात म्हणजेत थेट पैशाच्या स्वरुपात मिळत नसली तरी, त्यासाठी एका नियमाचं पालन केल्यास मात्र नव्या कर प्रणालीतूनही फायदा मिळवता येऊ शकतो. जिथं, ‘प्रॉपर्टी लेट आउट’ म्हणजेच मालमत्ता सेल्फ-ऑक्यूपाइड नव्हे तर भाडेतत्वावर दिलेली असावी.
कसा मिळेल फायदा?
स्टँडर्ड डिडक्शनचा विचार केला तर जुन्या व नव्या या दोन्ही करप्रमाणीत ते होणार आहे. त्यातल्या त्यात नव्या कर प्रणालीत जुन्या कर प्रणालीच्या तुलनेत जास्त डिडक्शन होणार नाहीत. नव्या करप्रमाणीनुसार सेल्फ-ऑक्यूपाइड प्रॉपर्टीतील व्याजदरावर कोणत्याही पद्धतीनं थेट कपात मिळत नाही. स्टँडर्ड डिडक्शन हे NPS एम्प्लॉयर कंट्रीब्यूशनच ग्राह्य धरलं जाणार आहे. म्हणजेच लोन भरत असणारे घर भाड्यानं दिलं असेल तर ‘इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी’ची मोजणी होत असताना तुम्ही व्याजामुळं झालेल्या Net Loss ची रक्कम अॅडजस्ट करू शकणार आहात. गृहकर्जाचं पूर्ण व्याज आणि भाडेतत्वामधून मिळणाऱ्या रकमेमधील अंतरास या नव्या करप्रमाणालीत तोटा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. ही रक्कम दुसऱ्या मिळकतीतून वजा करत समोर येणारा आकडा Set Off चा असतो.
नेमकं काय होणार?
उदाहरणार्थ, तुम्हाच्या होम लोनच्या व्याजचा भरणार तीन लाख रुपये आहे. त्यातून भाडेतत्वावर तुम्हाला एक लाख मिळाले. तर तो नेट लाँस समजून ही रक्कम भाड्याच्या रकमेतून वजा करुन मिळेल. म्हणजेच तुमचा झालेला दोन लाख रुपयांचा तोटा तुम्ही नव्या कर प्रणालीत अँडजेस्ट करुन थेट फायदा मिळवू शकणार आहेत. आता यात एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे तुम्ही नव्या कर प्रणालीत गृहकर्जावर थेट फायदा मिळवू शकणार नसला तरी तो सेट ऑफचा अप्रत्यक्ष फायदा मात्र मिळवू शकणार आहात.