Share Market मधील गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! प्रॉफिट कमी झाला पण तरीही ‘ही’ कंपनी प्रत्येक शेअर्सवर देणार डिविडेंट, रेकॉर्ड डेट जाहीर

गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 623.28 कोटी रुपये होता. मात्र प्रॉफिट कमी झालेला असतानाही कंपनीने नाद खुळा कार्यक्रम केला असून आपल्या गुंतवणूकदारांना डिविडेंट देण्याची घोषणा केली आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट देखील निश्चित करण्यात आली असल्याची माहिती कंपनीकडून समोर आली आहे.

Tejas B Shelar
Published:

NHPC Divident News : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या शेअर मार्केट मधील सूचीबद्ध कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत, तसेच काही कंपन्या तिमाही निकाल जाहीर करतानाच डिविडेंट देण्याची घोषणा करत आहेत आणि बोनस शेअर देण्याची घोषणा करत आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील जलविद्युत कंपनी NHPC ने सुद्धा अशीच एक मोठी घोषणा केली आहे. खरे तर कंपनीने नुकताच चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

तिमाही निकाल जाहीर करण्यासोबतच कंपनीने डिव्हीडंट म्हणजे लाभांश देण्याची मोठी घोषणा केली असून यामुळे हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे आणि या कंपनीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

गुंतवणूकदारांमध्ये सध्या कंपनीच्या या घोषणेची चर्चा आहे. NHPC ने प्रसिद्ध केलेल्या तिमाही निकालानुसार, या तिमाहीत तीचा नफा 47 टक्क्यांनी घसरून 330.13 कोटी रुपयांवर आला आहे. खर्च वाढल्याने कंपनीचा नफा कमी झाला आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 623.28 कोटी रुपये होता. मात्र प्रॉफिट कमी झालेला असतानाही कंपनीने नाद खुळा कार्यक्रम केला असून आपल्या गुंतवणूकदारांना डिविडेंट देण्याची घोषणा केली आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट देखील निश्चित करण्यात आली असल्याची माहिती कंपनीकडून समोर आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या कंपनीचा स्टॉक शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा फोकस मध्ये येईल असे म्हटले जात आहे.

NHPC ने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत त्यांचा एकूण खर्च वाढून 2,217.51 ​​कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,733.01 कोटी रुपये होता. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न किरकोळ वाढून रु. 2,616.89 कोटी झाले, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत रु. 2,549 कोटी होते.

डिविडेंटसाठी रेकॉर्ड डेट कोणती?

कंपनीच्या संचालक मंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 10 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्यावर 14 टक्के दराने अंतरिम लाभांश देण्यास मान्यता दिली आहे. अंतरिम लाभांश देण्यासाठी भागधारकांची पात्रता तपासण्याच्या उद्देशाने संचालक मंडळाने 13 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे.

NHPC च्या शेअरबद्दल बोलायचे झाले तर तो 77.43 रुपये आहे. गेल्या शुक्रवारी, स्टॉक 0.28% खाली बंद झाला. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 118.45 रुपये आहे. 13 जानेवारी 2025 रोजी शेअर 72.19 रुपयांवर होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe