NHPC Share Price : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. काल देखील भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला आणि आजही तशीच परिस्थिती दिसत आहे.
दरम्यान शेअर बाजारातील या अस्थिरतेच्या काळात काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देताना दिसतायेत आणि काही स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

यात हायड्रो पॉवर कंपनी NHPC चे शेअर्स सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असल्याचा दावा टॉप ब्रोकरेजकडून होतोय. खरेतर, आज गुरुवारी 20 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे स्टॉक ट्रेडिंग दरम्यान फोकस मध्ये राहिले आहेत. कंपनीचे स्टॉक आज 4% पेक्षा जास्त वाढलेत. सध्या हा स्टॉक 77.60 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहचलाय.
महत्त्वाचे म्हणजे टॉप ब्रोकरेज कडून या स्टॉकसाठी आता सकारात्मक आउट लोक दिला जात आहे आणि म्हणूनच आज आपण या स्टॉकची गेल्या पाच वर्षांमधील कामगिरी अन या स्टॉकसाठी काय टार्गेट प्राईस देण्यात आली आहे याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेअर्स तेजीत येण्याचे कारण अन टार्गेट प्राईस
शेअर्सच्या या वाढीमागे एक सकारात्मक अपडेट आहे. खरंतर, ब्रोकरेज फर्म CLSA ने NHPC ला ‘आउटपरफॉर्म’ वरून ‘हाय कन्व्हिक्शन आउटपरफॉर्म’ रेटिंगमध्ये अपग्रेड केले आहे. हाय कन्व्हिक्शनचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचा एक मोठा भाग इथं गुंतवू शकता.
हे त्याची मजबूत विकास क्षमता दर्शवते. CLSA ने NHPC कडे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, येत्या काही वर्षांत यातून मोठा नफा अपेक्षित आहे.
कंपनीचा विश्वास आहे की स्टॉकची मूलभूत तत्त्वे आणि आगामी प्रकल्प याला लक्षणीय चढ-उतारासाठी स्थान देतात. सध्या हा स्टॉक 77 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय मात्र लवकरच हा स्टॉक 117 रुपयांवर जाऊ शकतो असा ब्रोकरेज फर्म चा अंदाज आहे.
म्हणजेच ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी 117 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. आधी टार्गेट प्राईस 120 रुपये होती मात्र यामध्ये आता थोडीशी घट करण्यात आली आहे आणि 117 रुपये ही नवी टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. ब्रोकरेज फर्म नुसार पुढील चार वर्षात हा स्टॉक दुप्पट होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांना किती परतावा मिळाला
गेल्या बारा महिन्यांमध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. गेल्या बारा महिन्यांच्या काळात हा स्टॉक 21 टक्क्यांनी घसरला आहे मात्र दोन वर्षात या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 89% रिटर्न दिले आहेत.
तीन वर्षाच्या काळात या स्टॉकने 153% रिटर्न दिले आहेत आणि पाच वर्षात या स्टॉकने 253% रिटर्न दिले आहेत. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 77,678.25 कोटी रुपये इतके आहे.