हापूस आंब्याचे रेट पुन्हा गडगडलेत ! आता एक डझन आंब्यासाठी फक्त ‘इतके’ पैसे लागणार, नवीन रेट पहा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांसारख्या प्रमुख आंबा उत्पादक राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात घट आली आहे. परिणामी आंब्यांची आवक मोठी कमी झाली आहे, पण असे असतानाही आंब्याचे रेट कमी झाले आहेत.

Published on -

Mango Rate : हापूस आंब्याचे रेट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहेत. खरंतर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे फळांचा राजा आंबा पिकाचे मोठे नुकसान होत आहे आणि यामुळे आंब्याचा सीजन यंदा मोठ्या संकटात सापडला आहे.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने आणि वादळाने मोठे नुकसान केले आहे. कोकणातील रत्नागिरी, देवगड तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधून होणाऱ्या आंब्याच्या उत्पादनावर या विपरीत हवामानाचा मोठा परिणाम झाला आहे.

त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक फरपट होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे आंब्याच्या पिकावर विपरीत परिणाम झाला आहे,

यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची नासाडी झाली आहे आणि उत्पादनात घट झाली असल्याने आंब्याची आवकही कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून आंब्याचे रेट मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. दरम्यान आता आपण सध्या हापूस आंब्याचे रेट कसे आहे त्याचा आढावा घेणार आहोत. 

मार्केटमध्ये हापूसचे रेट कसे आहेत?

खरेतर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे हे दक्षिण भारतातील प्रमुख टर्मिनल मार्केट आहे. यामुळे पुण्यात दरवर्षी हजारो डझन आंबा विक्रीसाठी येत असतो. परंतु यंदा मार्चपासूनच पुण्याच्या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या आंब्यांची आवक कमी झाली.

हापूस आंब्याची आवक देखील कमी झाली. व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये मे महिन्यात साधारणतः 30 ते 40 हजार डझन आंबा दाखल होत असतो. पण पावसामुळे सध्या स्थितीला पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याची आवक या तुलनेत फारच कमी आहे.

एकीकडे आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र व कर्नाटक या प्रमुख आंबा उत्पादक राज्यांमध्ये सुरू असणाऱ्या पावसामुळे आंब्याच्या किमतीत घसरण झाली आहे.

म्हणजेच आंबा उत्पादकांना यंदा दुहेरी फटका बसतोय. मागील वर्षी या काळात म्हणजेच मे 2024 मध्ये हापूसची पेटी 1500-1800 रुपयांना विकली जात होती, ती यंदा फक्त 700-800 रुपयांना विकली जात आहे.

फक्त हापूस आंब्याच्या रेट मध्ये घसरण झाली आहे असे नाही तर पायरी आणि केसर आंब्याच्या दरातही 40-50% घसरण झाली आहे. फक्त खाण्यासाठीच नव्हे, तर कॅनिंग इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या आंब्याचाही दर 35-40 रुपयांवरून थेट 18 रुपयांवर खाली आला असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि यामुळे आंब्याची मागणी कमी झाली आणि म्हणूनच आवक कमी असताना सुद्धा आंब्याचे दर गडगडलेत अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. परिणामी शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीतच माल विकावा लागत असून, उत्पादन खर्चही वसूल होत नाही.  

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!