Ration Card Update : रेशन कार्ड धारकांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहे. या कागदपत्राचा वापर जवळपास सर्वच शासकीय कामांमध्ये केला जातो. ह्या कागदपत्राविना भारतात कोणतच शासकीय तसेच निमशासकीय काम होत नाही.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कागदपत्र अतिआवश्यक असते. याशिवाय रेशन कार्ड सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील आवश्यक असते. मात्र अनेकांच्या रेशन कार्ड मध्ये काही चुका असतात. रेशन कार्ड मधील नाव, जन्मतारीख किंवा इतर महत्त्वाच्या माहितीमध्ये तफावत आढळून येते.

दरम्यान रेशन कार्ड मधील माहिती मध्ये जर तफावत आढळून आली तर शासकीय कामांमध्ये अडचण निर्माण होते. अशा स्थितीत आज आपण रेशन कार्ड मधील चुका घरबसल्या कशा दुरुस्त करायच्यात याचीच माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेशन कार्ड मधील चुका दुरुस्त करण्याची प्रोसेस
खरे तर केंद्रातील शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशातील पात्र कुटुंबांना रास्त भावात गहू, तांदूळ, साखर व इतर अन्नधान्य उपलब्ध करून देते. मात्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते. याव्यतिरिक्त आयुष्यमान भारत योजना, लाडकी बहीण, उज्वला अशा असंख्य योजनांच्या लाभासाठी रेशन कार्डची गरज भासते. भारतात वेगवेगळ्या प्रकारचे रेशन कार्ड आहेत. दरम्यान रेशन कार्डच्या प्रकारानुसार लाभार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळतो.
यामुळे रेशन कार्ड मधील माहिती अपडेट आणि अचूक असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत जर रेशन कार्डमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक, चुकीची जन्मतारीख, कुटुंबातील सदस्यांची माहिती गहाळ असणे किंवा चुकीचा पत्ता अशा काही त्रुटी असतील तर अत्यल्प दरातील अन्नधान्य सोबतच वेगवेगळ्या योजनांच्या आणि शासकीय कामांच्या लाभासाठी सुद्धा अडचणी निर्माण होतात. रेशन कार्डमध्ये असणाऱ्या छोट्या चुका अनेकदा सवलती थांबवू शकतात.
यामुळे रेशन कार्ड मध्ये काही चूक झालेली असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करावी लागते आणि या दुरुस्तीसाठी आता ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहे. म्हणजेच रेशन कार्ड दुरुस्त करण्यासाठी आता पुरवठा विभागाच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत नाहीत. नागरिकांना घरबसल्या रेशन कार्ड मधील चुका दुरुस्त करता येतात. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.
या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर नागरिकांना रेशन कार्ड दुरुस्ती किंवा करेक्शन इन रेशन कार्ड या पर्यायात जाऊन रेशन कार्ड मधील दुरुस्ती करावी लागते. रेशन कार्ड दुरुस्तीच्या पर्यायात गेल्यानंतर रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर मग सर्च बटनावर क्लिक करावे लागते. यानंतर संबंधित रेशन कार्ड धारकाला त्याच्या सर्व सदस्यांची नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी माहिती मध्ये आवश्यक तो बदल करता येतो.
मात्र माहिती भरताना व्हॅलिड कागदपत्रांच्या आधारावरच माहिती भरायला हवी. दरम्यान सर्व माहिती भरली गेली की सबमिट या पर्यावर क्लिक करावे लागते आणि अर्ज सबमिट करावा लागतो. अर्ज सबमिट झाला की त्यानंतर मग संबंधित विभागाच्या माध्यमातून पडताळणी केली जाते आणि अवघ्या काही दिवसानंतर रेशन कार्ड मधील दुरुस्ती पूर्ण होते.











