Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

गुंतवणूकदार होणार मालामाल, NTPC शेअर पुन्हा फोकसमध्ये ! जबरदस्त तेजी, टार्गेट प्राईस नोट करा

वीन वर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस वगळता भारतीय शेअर बाजारात जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दबाव दिसला. अजूनही मार्केट आधीसारखे तेजीत नाहीये, पण जोरदार घसरणीनंतर गत तीन दिवसांपासून तेजी येत आहे. म्हणून गुंतवणूकदार थोडेसे प्रसन्न आहेत.

Tejas B Shelar
Published on - Thursday, January 30, 2025, 5:21 PM

NTPC Share Price : आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आज 174.43 अंकांनी वधारून 76707.39 वर खुला झाला अन नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेचं एनएसई निफ्टी 75.10 अंकांनी वधारून 23238.20 वर खुला झाला. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

खरे तर नवीन वर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस वगळता भारतीय शेअर बाजारात जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दबाव दिसला. अजूनही मार्केट आधीसारखे तेजीत नाहीये, पण जोरदार घसरणीनंतर गत तीन दिवसांपासून तेजी येत आहे.

NTPC Share Price
NTPC Share Price

म्हणून गुंतवणूकदार थोडेसे प्रसन्न आहेत. दरम्यान शेअर बाजारातील यात्रेची च्या काळातच एनटीपीसी शेअर संदर्भात नवीन अपडेट हाती आली आहे. या स्टॉक मध्ये पुन्हा एकदा तेजीचे संकेत मिळत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना आगामी काळात चांगला परतावा मिळेल अशी आशा व्यक्त होताना दिसते.

दरम्यान आज आपण या स्टॉकची सध्याची शेअर मार्केट वरील परिस्थिती, तसेच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये किती परतावा दिला आहे, या स्टॉकबाबत ब्रोकरेज चा अंदाज काय सांगतोय याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Related News for You

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ई-केवायसीतील त्रुटींमुळे लाभ थांबलेल्या महिलांसाठी १८१ हेल्पलाइन जाहीर
  • अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच का? 2026 च्या बजेटकडून करदाते आणि गुंतवणूकदारांच्या मोठ्या अपेक्षा
  • राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडीचा जोर कमी, उष्णतेत वाढ; पुढील दोन दिवसांत बदलाची शक्यता
  • अनुदानित व विना-अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदान मंजूर; GR जारी

एनटीपीसी शेअरची स्टॉक मार्केटवरील सध्याची स्थिती

आज, 30 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर फोकस मध्ये आला आहे. या स्टॉक ची किंमत आज 0.51 टक्क्यांनी वधारली. सध्या हा स्टॉक 322.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज सकाळी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु होताच हा शेअर 322.25 रुपयांवर ओपन झाला होता.

आज दुपारी 2.58 वाजता एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरचा दिवसभरातील उच्चांक 326.80 रुपये होता, तर निच्चांकी स्तर 321.40 रुपये होता. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 448.45 रुपये अन 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 296.85 रुपये इतका राहिला. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,12,960 Cr रुपये इतके आहे.

पण, कंपनीवर 2,42,009 Cr रुपये इतकं कर्ज आहे. मात्र या स्टॉक साठी सी एल एस ए ब्रोकरेज फर्म बुलिश आहे. ब्रोकरेजने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत आता आपण या स्टॉक साठी ब्रोकरेज ने काय टार्गेट प्राईज निश्चित केली आहे हे पाहणार आहोत.

टार्गेट प्राईज काय आहे?

एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर CLSA ब्रोकरेज फर्मने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी ब्रोकरेज कडून ‘BUY’ रेटींग जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 459 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. नक्कीच ब्रोकरेजने म्हटल्याप्रमाणे या स्टॉकच्या किमतीत 459 रुपयापर्यंत वाढ झाली तर गुंतवणूकदारांना यातून चांगला नफा मिळणार आहे.

या स्टॉकने गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे?

आता आपण या स्टॉकची गेल्या पाच वर्षांची कामगिरी पाहणार आहोत. गेल्या पाच वर्षांमध्ये स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे याबाबत आता माहिती जाणून घेऊयात. खरंतर आज या स्टॉकच्या किमती थोड्या वाढल्या असल्या तरी देखील मागील 5 दिवसात एनटीपीसी लिमिटेड शेअर -1.28 टक्क्यांनी घसरला आहे. मागील 1 महिन्यात एनटीपीसी लिमिटेड शेअर -2.87 टक्क्यांनी घसरला आहे.

तसेच मागील 6 महिन्यात एनटीपीसी लिमिटेड शेअर -20.90 टक्क्यांनी घसरला आहे. पण, मागील 1 वर्षात एनटीपीसी लिमिटेड शेअर 2.09 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर -3.48 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान मागील 5 वर्षात हा शेअर 195.19 टक्क्यांनी वाढला आहे. शिवाय लॉन्ग टर्ममध्ये हा स्टॉक 411.52 टक्क्यांनी वाढला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ई-केवायसीतील त्रुटींमुळे लाभ थांबलेल्या महिलांसाठी १८१ हेल्पलाइन जाहीर

Ladki Bahin Yojana

अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच का? 2026 च्या बजेटकडून करदाते आणि गुंतवणूकदारांच्या मोठ्या अपेक्षा

Budget 2026

राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडीचा जोर कमी, उष्णतेत वाढ; पुढील दोन दिवसांत बदलाची शक्यता

Maharashtra Havaman Andaj

अनुदानित व विना-अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदान मंजूर; GR जारी

Maharashtra Teacher News

फेब्रुवारी २०२६ मध्ये मिळणाऱ्या जानेवारी महिन्याच्या वेतनाबाबत आनंदाची बातमी; शासन निर्णय (GR) जाहीर!

Maharashtra Teachers

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय : 23 जानेवारी 2026 रोजी तीन मोठे शासन निर्णय (GR) जारी

State Employee News

Recent Stories

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी चिंताजनक! ‘या’ शेअर्समध्ये जोरदार घसरण

Share Market

बजाज पल्सरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ! 90 हजारात लाँच झाली नवी पल्सर, कसे आहेत नव्या गाडीचे फिचर्स?

New Bajaj Pulsar

फक्त आधार कार्ड दाखवून मिळणार 90 हजार रुपयांचे कर्ज ! सरकारची ‘ही’ योजना ठरतेय गेमचेंजर

Aadhar Card Rules

सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा ! २४ तासात सोन्याच्या किंमतीत ३५०० रुपयांची घट, वाचा सविस्तर

Gold Rate Prediction

आज गुंतवणूक सुरु करा, 21 व्या वर्षी मिळणार 71 लाख रुपये ! ही सरकारी योजना ठरणार गेमचेंजर

सोन्यात गुंतवणूक करताय ? पुढील दोन-तीन वर्षात सोन्याच्या किमती किती वाढतील ? वाचा…

Gold Rate

अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ: खा. निलेश लंके यांच्या भावाला महिला विनयभंग प्रकरणात हायकोर्टाचा दणका

Nagar News
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2026 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy