Numerology News : अंकशास्त्र व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचे संपूर्ण भविष्य सांगते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून निघणाऱ्या मुलांकावरून व्यक्तीचे भूत, भविष्य आणि वर्तमान याचे योग्य पद्धतीने कथन होऊ शकते. मुलांकाच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व देखील अधोरेखित होत असते हे विशेष. पण अनेकांना मुलांक नेमका कसा काढायचा हे समजत नाही.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की तुमच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक काढला जातो. अर्थात एखाद्याची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 2 तारीख असेल तर त्याचा मुलांक हा 2 राहणार आहे.

जर समजा एखाद्याची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 11 तारीख असेल तर त्याचा मुलांक हा देखील 1+1 = 2 राहणार आहे. दरम्यान आज आपण अशा एका मुलांकाची माहिती जाणून घेणार आहोत ज्या मुलांकाच्या लोकांवर न्यायदेवता शनि देवाची विशेष कृपा राहते.
आपल्या न्यायप्रिय स्वभावामुळे हे लोक कोणत्याच क्षेत्रात अपयशी ठरत नाहीत. कोणत्याही क्षेत्रात या लोकांना यश प्राप्त होते, स्वतः शनीदेवाची या लोकांना साथ राहते.
कोणत्या मुलांकाचे लोक कधीच अपयशी ठरत नाहीत?
अंकशास्त्रानुसार , मुलांक ८ असणारे लोक कोणत्याच क्षेत्रात सहजासहजी पराभूत होत नाहीत. खडकातून पाणी काढण्याची क्षमता या लोकात असते. अत्यंत शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय म्हणून या लोकांची ओळख बनते.
पण, मुलांक 8 म्हणजे कोणत्या तारखेला जन्मलेले लोक? कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. ८ या मूलांकाचा स्वामी ग्रह शनी आहे.
त्यामुळे शनि देवाचा प्रभाव या राशीच्या लोकांवर अधिक असतो आणि न्यायदेवता शनि देवाची या राशीच्या लोकांवर विशेष कृपाही राहते. शनिदेव हे अत्यंत न्यायप्रिय, शिस्तप्रिय आणि कर्मानुसार फळ देणारे देवता आहेत.
त्यामुळेच ८ या मूलांकाचे लोकसुद्धा अत्यंत शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय असतात. या लोकांना घरामध्ये किंवा राहत्या ठिकाणी पसारा, गोंधळ, अस्वच्छता अजिबात आवडत नाही.
भौतिक आणि अध्यात्मिक गोष्टीत कसा समतोल राखायचा हे या लोकांना चांगलेच समजते. हे लोक प्रत्येकच ठिकाणी यशस्वी होतात. आपल्या प्रामाणिक कष्टामुळे हे लोक प्रत्येक ठिकाणी यशस्वी होतात.
केवळ आपल्या कष्टाच्या जोरावर हे लोक अमाप संपत्ती कमवतात. चांगले काम केले तर आपल्याला काहीतरी चांगलंच मिळणार अशी भावना या लोकांची असते. मात्र, या लोकांना पराभव पचत नाही हे देखील तेवढेच खरे आहे.